• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Shilpa Shetty आणि Raj Kundra च्या अडचणीत वाढ, मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल

Shilpa Shetty आणि Raj Kundra च्या अडचणीत वाढ, मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)आणि तिचा पती बिझनेसमन राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

  • Share this:
    मुंबई, 14 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)आणि तिचा पती बिझनेसमन राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. पॉर्नोग्राफी (Pornography Case) प्रकरणामुळे दोघं आधीपासूनच अडचणीत सापडले आहेत. त्यात आता त्यातच नव्यानं भर पडली आहे. काही दिवसांपूर्वीच राज कुंद्राला जामीन मिळाला आहे. त्यानंतर आता त्याचं नाव आणखी एका प्रकरणात पुढे आलं आहे. मात्र यावेळी राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टीचंही नाव पुढे आलं आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये (Mumbai Bandra Police) फसवणूक आणि धमकावल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा-  मोठी बातमी :BCCI ची होणार चांदी, IPL च्या कमाईवर द्यावा लागणार नाही टॅक्स मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये नितीन बराई नावाच्या व्यक्तीने अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा, काशिफ खान यांच्यासह काही लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण 2014 चं असून तक्रारीनुसार, राज आणि शिल्पानं बरई यांची एक कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. काय आहे नेमकं प्रकरण नितीन बराई यांच्या तक्रारीनुसार, 2014 मध्ये SFL फिटनेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक काशिफ खान, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी पीडितेला फिटनेस व्यवसायात 1 कोटी 51 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले होते. जर त्यानं यांच्या कंपनीची फ्रंचायजी घेतली आणि पुण्याच्या कोरेगाव परिसरात स्पा आणि जीम सुरु केली तर खूप फायदा होईल. मात्र नंतर काही सुरळीत न झाल्यानं आरोपींनी त्यांचे पैसे परत मागितले. त्यानंतर त्यांना धमकावण्यात आलं. हेही वाचा- अमरावतीतल्या सद्यस्थितीबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिली मोठी अपडेट बरई यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी कलम 406,409,420,506,34,120 (B) अंतर्गत गुन्हा दाखल केलाअ असून या प्रकरणाची चौकशी देखील सुरु केली आहे. मुंबई पोलिस या प्रकरणी सर्वांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांची बाजू जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून त्यांना लवकर संपर्क करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published: