मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Moving In With Malaika: कॅमेऱ्यासमोर मुलानेच उडवली मलायकाची खिल्ली; म्हणाला 'तू तुरुंगातील कैद्यासारखी...'

Moving In With Malaika: कॅमेऱ्यासमोर मुलानेच उडवली मलायकाची खिल्ली; म्हणाला 'तू तुरुंगातील कैद्यासारखी...'

मलायका अरोरा

मलायका अरोरा

सध्या अभिनेत्री मलायका अरोराचा रिअॅलिटी शो मूव्हिंग विथ मलायका खूप चर्चेत आहे. शोच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये मलायकाचा मुलगा अरहान खान या स्पेशल पाहुणा म्हणून दिसणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 डिसेंबर : आपल्या बोल्ड अंदाजामुळे सगळ्यांना घायाळ करणारी बॉलिवूड डिवा अभिनेत्री मलायका अरोरा सतत चर्चेत असते. मलायका तिचा बोल्ड जीम लुक असो किंवा ग्लॅमरस अंदाज यामुळे कायमच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. सध्या मलायका तिचा आगामी शो 'मूव्हिंग इन विथ मलायका'मुळे प्रचंड चर्चेत आहे. या शोचा एक प्रोमो व्हिडीओही समोर आला आहे.  मलायकाच्या शोबद्दल तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. यामध्ये ती केवळ तिच्या प्रोफेशनल लाईफचीच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही चर्चा करताना दिसणार आहे.

सध्या अभिनेत्री मलायका अरोराचा रिअॅलिटी शो मूव्हिंग विथ मलायका खूप चर्चेत आहे.  शोच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये मलायकाचा मुलगा अरहान खान या स्पेशल पाहुणा म्हणून दिसणार आहे. या दरम्यान अरहानने त्याची मावशी अमृता अरोरा आणि त्याची आई आणि शोची होस्ट मलायका अरोरा यांच्याशीही खूप गप्पा मारल्या. पण याच गप्पांदरम्यान अरहानने थेट आपल्या आईची खिल्ली उडवली.

हेही वाचा - Tamanna Bhatia: 13 व्या वर्षीच चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेली तमन्ना आज आहे इतक्या कोटींची मालकीण; वाचून वाटेल आश्चर्य

अरहान म्हणाला, 'अमू म्हणजेच (अमृता अरोरा) माझ्या दुसऱ्या आईसारखी आहे, पण आता मला ती आईपेक्षाही जवळ आल्यासारखे वाटते. त्यानंतर अरहान हसत म्हणाला की तो मस्करी करतोय.

याच गप्पांदरम्यान त्याने मलायकाच्या पोशाखाची खिल्ली उडवली. यावेळी अरहान खान खूप आनंदी मूडमध्ये दिसत होता. त्याने उघड केले की त्याच्या आणि त्याच्या आईमध्ये एकच गोष्ट साम्य आहे ती म्हणजे ते दोघेही त्यांच्या आई-बाबांचे मोठे मुलं आहेत. या शोमध्ये आई-मुलाच्या जोडीने खूप मजा केली. मलायकाचा ड्रेस पाहिल्यानंतर अरहानने तिची तुलना टेबल नॅपकिनशी केली. अरहान म्हणाला, तू सध्या तुरुंगातील कैद्यासारखा दिसत आहेस. मलायकाही आपल्या मुलाच्या या कमेंटवर काही बोलू शकली नाही, फक्त हसत राहिली. अरहान त्याची मावशी अमृता अरोराच्या खूप जवळ आहे. अरहानने अमृताचे वर्णन त्याची दुसरी आई असे केले आहे.

अरहान खान मलायका आणि अरबाज खान यांचा मुलगा आहे. दोघांचा घटस्फोट झाला असला तरी अरबाज आणि मलायका यांच्यात अजूनही चांगले संबंध आहेत. अरहानबद्दल सांगायचे तर, सध्या तो अमेरिकेत फिल्म मेकिंगचे शिक्षण घेत आहे आणि लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकतो.

दरम्यान, मलायका तिच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत असते. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघेही कायम एकत्र स्पॉट होतात. बी-टाऊनमधील लोकप्रिय कपलपैकी मलायका आणि अर्जुन आहेत. दोघे कधी लग्न करणार? असा प्रश्न चाहते कायमच विचारतात. गेल्या काही दिवसांपूर्वी मलायका आई बनणार असल्याच्याही चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र यावर अर्जुनने संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्याने पोस्ट शेअर करत अप्रत्यक्षपणे या बातम्या फेटाळल्या होत्या.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Malaika arora