मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Malaika- Arjun: मलायका अरोरा प्रेग्नेंट? अर्जुन कपूर म्हणाला 'आमच्या खाजगी आयुष्याबद्दल...'

Malaika- Arjun: मलायका अरोरा प्रेग्नेंट? अर्जुन कपूर म्हणाला 'आमच्या खाजगी आयुष्याबद्दल...'

मलायका अरोरा-अर्जुन कपूर

मलायका अरोरा-अर्जुन कपूर

मलायका अरोरा प्रेग्नंट असल्याच्या बातम्या खूप चर्चेत आहेत. आता या बातम्यांनंतर अर्जुन कपूरने मोठं वक्तव्य केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 30 नोव्हेंबर : बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या अविवाहित जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा. बऱ्याच काळापासून एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये असलेले अर्जुन आणि मलायका त्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. ही जोडी लग्न कधी करणार याविषयी त्यांच्या चाहत्यांच्या मनात नेहमीच उत्सुकता असते. अखेर या दोघांनी 2019 मध्ये ते रिलेशनशीपमध्ये आहेत यावर शिक्कामोर्तब केलं होतं. सध्या या  जोडप्याची खूपच चर्चा आहे. ते मलायका अरोरा प्रेग्नंट असल्याच्या बातम्या खूप चर्चेत आहेत. आता या बातम्यांनंतर अर्जुन कपूरने मोठं वक्तव्य केलं आहे.

पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याने मलायका प्रेग्नेंट असल्याची गोड बातमी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या जवळच्या मित्रांना दिली होती. ही बातमी पसरताच आता अर्जुनने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, 'मलायका आणि अर्जुन कपूर ऑक्टोबरमध्ये लंडनच्या सुट्टीवर गेले होते, जिथे त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांसमोर प्रेग्नेंसीची गोड बातमी दिली होती.' अशी माहिती समोर आली होती.

हेही वाचा - Vijay Deverakonda: दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाला ईडीकडून समन्स; 'हे' आहे कारण

ही बातमी पसरताच अर्जुन कपूरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याचे खंडन केले आहे. त्याने लिहिलंय की, ''अत्यंत खालच्या थराला जाऊन आणि तेही अगदी सहजरित्या तुम्ही ही बातमी दिली. यातून असंवेदनशील व अनैतिकपणा दिसतो. रोज अशा बातम्या तुम्ही देत आहात, ज्याकडे आम्ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. हे बरोबर नाही. आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याची हिंमत करू नका'', असं अर्जुनने म्हटलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी त्यांचे नाते जगासमोर आणले आहे. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. पण ते लग्न करणार का, या प्रश्नावर अर्जुन आणि मलायका अनेकदा मौन बाळगतात.  मलायका अरोराने मध्यंतरी इंस्टाग्रामवर अशी पोस्ट केली होती. ज्यामध्ये मलायका अरोराने तिच्या हिऱ्याची अंगठी फ्लॉंट करताना एक फोटो पोस्ट केला ज्यामुळे मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करणार आहेत का, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

अलीकडे, मलायका अरोराने तिच्या हिऱ्याची अंगठी फ्लॉंट करताना एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये तिने कॅप्शनमध्ये लिहिले की मी हो केले आहे. एंगेजमेंटच्या अफवा उडू लागल्यानंतर, मलायकाने दुसर्‍या पोस्टमध्ये खुलासा केला की तिने डिस्ने प्लस हॉटस्टारवरील रिअॅलिटी शो मूव्हिंग विथ मलायकाला होकार दिला आहे. अर्जुन- मलायका गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2019 मध्ये अर्जुन कपूरच्या वाढदिवशी एका पोस्टद्वारे दोघांनी नाते अधिकृत केले होते. तेव्हापासून दोघेही रोमँटिक डेट आणि व्हेकेशनवर दिसले. 2023 मध्ये दोघेही लग्न करू शकतात अशा बातम्या अलीकडे आल्या होत्या, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

First published:

Tags: Arjun kapoor, Bollywood, Bollywood actor, Entertainment, Malaika arora