अर्जुनसोबत क्लिनिकमध्ये पोहोचली मलायका अरोरा, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

अर्जुनसोबत क्लिनिकमध्ये पोहोचली मलायका अरोरा, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

मलायका आणि अर्जुनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 1 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतात. नुकतेच हे दोघंही एका क्लिनिकच्या बाहेर स्पॉट झाल्यानं त्यांच्याविषयीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, नेहमीप्रमाणं या दोघांनीही थांबून फोटोग्राफर्सना पोझ दिली नाही. क्लिनिकमधून बाहेर येताच दोघंही त्यांच्या कारमध्ये बसून निघून गेले.

मलायका आणि अर्जुनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात मलायका व्हाइट कलरचा टॉप आणि शॉर्ट पॅन्टमध्ये दिसत आहे. या कॅज्युअल लुकवर मलायका केसांचा बन आणि डोळ्यांवर गॉगल लावलेली दिसत आहे. तर अर्जुन कपूर सुद्धा ब्लॅक कलरच्या कॅज्युअल टी-शर्टमध्ये दिसत आहे. दरम्यान हे दोघंही क्लिनिकमध्ये का गेले होते याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या आधीही काही महिन्यांपूर्वी हे दोघं एकत्र एका क्लिनिकच्या बाहेर स्पॉट झाले होते ज्यामुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या.

‘ती अजूनही माझ्या कवेत आहे’, विवेकच्या वक्तव्यानंतर सलमानने दिली होती धमकी

 

View this post on Instagram

 

#arjunkapoor #malaikaarora snapped post a clinic visit in #mumbai today #manavmanglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

काही दिवसांपूर्वी मलायकाच्या 46 व्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये अर्जुन कपूर धम्माल डान्स करताना दिसला. तसेच मलायकाच्या वाढदिवसाला त्यानं इन्स्टाग्रामवर तिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत तिला हटके पद्धतीनं विश केलं होतं. काही दिवसांपूर्वीच या दोघांनीही त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर व्हेकेशनमध्ये ते एकत्र फिरताना दिसले. दरम्यान त्यांच्या वयातील अंतरामुळे त्यांच्यावर अनेकदा टीकाही करण्यात आली आहे.

KBC च्या इतिहासात पहिल्यांदाच ‘कम्प्यूटर जीं’वर उठला सवाल, वाचा नक्की काय झालं

अभिनेता अक्षय कुमारचं मन जिंकणारं 'हे' आहे झोपडीत राहणारं श्रीमंत कुटुंब

================================================================

VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 01:20 PM IST

ताज्या बातम्या