‘ती अजूनही माझ्या कवेत आहे’, विवेकच्या वक्तव्यानंतर सलमानने दिली होती धमकी

‘ती अजूनही माझ्या कवेत आहे’, विवेकच्या वक्तव्यानंतर सलमानने दिली होती धमकी

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज 46वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • Share this:

मुंबई, 1 नोव्हेंबर : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज 46वा वाढदिवस साजरा करत आहे. ऐश्वर्या आज बच्चन खानदानाची सून असली तरीही आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली ती ऐश्वर्या आणि सलमानची लव्हस्टोरी. 'हम दिल चुके सनम' सिनेमापासून ऐश्वर्या आणि सलमान यांचं प्रेम बहरलं आणि मग 'दबंग' खानची दबंगगिरी चांगलीच जाणवायला लागली. आधी प्रेमाच्या कथा आणि नंतर त्यांच्यामधल्या तणावाची चर्चाही रंगू लागली. एकदा ऐश्वर्या रायच्या घराबाहेर सलमाननं गोंधळ घातला आणि मग सगळंच तुटलं. दोघांचे मार्ग पूर्ण वेगळे झाले. ऐश्वर्या राय नंतर बच्चन खानदानाची सून झाली.

दरम्यान ऐश्वर्या रायसाठीचं सलमान खान आणि विवेक ओबेरॉयचं भांडणं साऱ्यांनाच माहीत आहे. प्रेमाच्या या त्रिकोणाने जेवढा वाद पाहिला तेवढा वाद आतापर्यंत कोणत्याच कपलने पाहिला नसेल. सलमानशी ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याची विवेकशी मैत्री वाढू लागली. विवेक आणि ऐश्वर्या अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरताना दिसू लागले. यातच एकदा टीव्हीवर विवेकने ऐश्वर्यावर असलेल्या प्रेमाचा स्वीकार करत ती त्याच्या कवेत असल्याचं म्हटलं होतं. त्याचं हे वक्तव्य ऐकून सलमानने त्याला धमकीही दिली होती.

अभिनेता अक्षय कुमारचं मन जिंकणारं 'हे' आहे झोपडीत राहणारं श्रीमंत कुटुंब

 

View this post on Instagram

 

✨❤️OURS...

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

त्याचे झाले असे की, करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये विवेक गेला होता. या दरम्यान, ऐश्वर्या राय हॉलिवूडमध्ये की बॉलिवूडमध्ये असा प्रश्न विचारला होता. याचं उत्तर देताना विवेक म्हणाला की, ‘ऐश्वर्या माझ्या कवेत...’ त्यावेळी ऐश्वर्या आणि विवेक एकमेकांना डेट करत होते. पण काही महिन्यांनी दोन्ही स्टार एकमेकांपासून वेगळे झाले. यानंतर एका पत्रकार परिषदेत विवेकने त्याला सलमानकडून धमकी मिळाल्याचा उल्लेख केला होता.

पुन्हा #MeToo, अन्नू मलिकवर या गायिकेनं केला लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

 

View this post on Instagram

 

⏱Longines Family wishing All Seasons Greetings with all our love always ✨✨

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

२००३ मध्ये एका मुलाखतीत विवेक म्हणाला की, ‘सलमानने नशेत असताना त्याला फोन केला होता आणि जीवे मारण्याची धमकीही दिली होती.’ यानंतर सलमान विवेकला उध्वस्त करण्याबद्दलही बोलला होता. या सर्व प्रकरणानंतर विवेकने एका पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर सलमानची माफी मागितली होती. पण आजही जवळपास १६ वर्षांनंतरही सलमान आणि विवेक एकमेकांसमोर यायचं टाळतात.

मागीतलं पाणी, मिळाली गुळ भाकरी; झोपडीतल्या पाहुणचाराने भारावला अक्षय कुमार

=============================================================

VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 09:38 AM IST

ताज्या बातम्या