मुंबई, 1 नोव्हेंबर : सोनी टीव्हीवरील क्विज शो ‘कौन बनेगा करोडपती’ला सध्या खूपच लोकप्रियता मिळत आहे. या शोच्या 31 ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये नोएडातून आलेले स्पर्धक भावेश झा यांनी 25 लाखांच्या प्रश्नावर हा खेळ थांबवला. मात्र खेळ सोडण्याआधी त्यांनी चक्क केबीसीच्या ‘कम्प्यूटर जी’वरच शंका उपस्थित केली. वैतागून या स्पर्धकांन म्हटलं, माहित नाही हे ‘कम्प्यूटर जी’ कसे-कसे प्रश्न विचारतात. भावेश झा यांनी हा खेळ सोडण्याआधी त्यांच्या सर्व लाइफलाइन वापरल्या होत्या. 12.50 लाख रुपये जिंकून ते या शोमधून बाहेर पडले. मात्र जाता जाता त्यांनी ‘कम्प्यूटर जी’ कसे-कसे प्रश्न विचारत आहे असं अमिताभ यांना विचारलं. भावेश यांना विचारण्यात आलेले प्रश्न प्रश्न : वजनाचा विचार करता तयार केलेलं सर्वात मोठं विमान कोणतं आहे? उत्तर : antonvov an-225 myria अभिनेता अक्षय कुमारचं मन जिंकणारं ‘हे’ आहे झोपडीत राहणारं श्रीमंत कुटुंब प्रश्न : 1930 च्या दशकात कोलकाताच्या एका व्यापाऱ्यानं स्थानिक व्यापऱ्याकडून 10 हजार रुपये घेऊन एंग्लो इंडियन लोकांसाठी कोणत्या शहराची स्थापना केली होती? उत्तर : मॅकलुस्कीगंज प्रश्न : वर्तमान लोकसभेत यातील कोणत्या राजकीय पक्षाचे कमीत कमी एक सदस्य आहे? उत्तर : तेलगु देशम पार्टी (TDP)
प्रश्न : आतापर्यंत कोणत्या खेळतील खेळडूंना सर्वाधिक राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाले आहेत? उत्तर : शूटिंग प्रश्न : 2019 मधील भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार 3 वैज्ञानिकांना कोणत्या संशोधनासाठी देण्यात आला? उत्तर : ब्रह्मांडातील पृथ्वीचं स्थान प्रश्न : महाभारतानुसार अर्जुनाची कोणती पत्नी नागकन्या होती? उत्तर : उलूपी पुन्हा #MeToo, अन्नू मलिकवर या गायिकेनं केला लैंगिक गैरवर्तनाचा आरोप
प्रश्न : या चित्रात बौध्द धर्माचं कोणतं पवित्र स्थान दिसत आहे? उत्तर : बोध गया प्रश्न : या व्हिडीओ क्लिपमध्ये दिसणारे हास्य कवी ओळखा. उत्तर : अशोक चक्रधर प्रश्न : करनालमधील 2017मध्ये तयार करण्यात आलेल्या मेडिकल कॉलेजला कोणाचं नाव देण्यात आलं आहे? उत्तर : कल्पना चावला मागितलं पाणी, मिळाली गुळ भाकरी; झोपडीतल्या पाहुणचाराने भारावला अक्षय कुमार =============================================================== VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

)







