मुंबई, 10 नोव्हेंबर : बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या अविवाहित जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा. बऱ्याच काळापासून एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये असलेले अर्जुन आणि मलायका त्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. ही जोडी लग्न कधी करणार याविषयी त्यांच्या चाहत्यांच्या मनात नेहमीच उत्सुकता असते. अखेर या दोघांनी 2019 मध्ये ते रिलेशनशीपमध्ये आहेत यावर शिक्कामोर्तब केलं होतं. आजपर्यंत त्यांच्या लग्नाविषयी अनेक अफवा आणि अंदाज व्यक्त केले जात होते. आता त्यांनी नात्यात एक पाऊल पुढे टाकत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या वर्षअखेरीला ही जोडी बोहल्यावर चढणार आहे. मलायकाने पोस्ट करत याविषयी मोठा संकेत दिला आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी त्यांचे नाते जगासमोर आणले आहे. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. पण ते लग्न करणार का, या प्रश्नावर अर्जुन आणि मलायका अनेकदा मौन बाळगतात. मलायका अरोराच्या नवीन इंस्टाग्राम पोस्टने या जोडीच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. मलायका अरोराने इंस्टाग्रामवर अशी पोस्ट केली आहे, ज्यामुळे मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करणार आहेत का, असा प्रश्न लोकांना पडला आहे.
हेही वाचा - Alia Ranbir Daughter : पहिल्यांदाच दिसली आलिया रणबीरच्या लेकीची झलक; फोटो व्हायरल
खरंतर मलायका अरोरा हिने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. पण त्याचा कॅप्शन वाचून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. मलायकाने या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे, 'I said YES...' म्हणजेच मी हो म्हणाले. या पोस्टमुळे चाहत्यांच्या मनात आनंद आणि शंका दोन्ही एकत्रच आल्या आहेत. तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
मलायकाच्या या पोस्टमुळे लोकांना प्रश्न पडला आहे की हा खरोखर अर्जुन-मलायकाच्या लग्नाचा इशारा आहे की केवळ एखादा पब्लिसिटी स्टंट आहे. हे चाहत्यांना कळत नाहीये. कारण याआधीही अनेकदा स्टार्सनी आपल्या सोशल मीडियाचा अशाप्रकारे प्रचारासाठी वापर केला आहे. याआधी, सोनाक्षी सिन्हाने असेच फोटो शेअर केले होते, पण ते नंतर तिच्या नवीन व्यवसाय 'सोईज' च्या प्रमोशनसाठी होते हे समोर आलं. त्यामुळे मलायका सुद्धा असंच काही करत नसेल ना यामुळे चाहते बुचकळ्यात पडले आहेत.
याआधी कॉफी विथ करणमध्ये चुलत बहीण सोनम कपूरसोबत पोहोचलेल्या अर्जुनने आपल्या लग्नाच्या प्रश्नावर स्पष्टपणे काहीही सांगण्यास नकार दिला होता. मात्र, मलायकाच्या येण्याने त्याच्या आयुष्यात बरेच सकारात्मक बदल झाल्याचे अर्जुनचे मत आहे. त्यामुळे हे दोघे कधी लग्न करणार याकडेच चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arjun kapoor, Bollywood actress, Bollywood News, Malaika arora