मुंबई, 10 नोव्हेंबर : आलिया भट्टने 6 नोव्हेंबरला एका मुलीला जन्म दिला. आई-वडील झाल्यानंतर आलिया आणि रणबीरच्या आनंदाला पारावार उरला नाही. संपूर्ण कपूर कुटुंब आणि भट्ट कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. घरात लहान परी आल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले आहेत. आता कपूर कुटुंबानेही लिटिल प्रिन्सेसच्या स्वागतासाठी खास तयारी केली आहे. आज सकाळी आलियाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. आई झाल्यानंतर आलियाची पहिली झलक चाहत्यांना पाहायला मिळाली.
रणबीर आणि आलियाच्या गाडीतून हॉस्पिटलमधून निघतानाचे फोटो समोर आले आहेत, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. रणबीर आणि आलिया त्यांच्या छोट्या देवदूतासह हॉस्पिटलमधून निघून गेले आहेत. आलिया आणि तिच्या छोट्या परीची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक चाहत्यांनी हॉस्पिटलबाहेर एकच गर्दी केली. कपूर घराण्याची छोटी चिमुकली कशी दिसते हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आलिया भट्टच्या डिलिव्हरीनंतर चाहत्यांना पहिली झलक पाहायला मिळाली. आलिया कारच्या आरशातून बाहेर पाहत असल्याचे चित्र सोशल मीडियावरही गाजत आहे. आलिया ब्लॅक आउटफिटमध्ये नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. आई झाल्याचा आनंद आणि आराम आलियाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
हेही वाचा - Alia Bhatt: आई बनण्यात आलियाने मोडला सासूचा रेकॉर्ड; लग्नानंतर 6 महिन्यांतच दिला मुलीला जन्म
या जोडप्याच्या मुलीचे अनेक फेक फोटोही व्हायरल झाले आहेत. सध्या आलियाचा एका बाळा सोबतचा फोटो खूप व्हायरल होत आहे, असे बोलले जात आहे की हा आलियाचा खरा फोटो आहे, तर सत्य काही वेगळेच आहे. आलियाने आतापर्यंत मुलीचा फोटो शेअर केलेला नाही. तो फेक फोटो आहे. बाळाच्या जन्मानंतर काही सेलेब्स फोटो काढण्यासाठी हॉस्पिटलमधून बाहेर पडतात. त्याचप्रमाणे आता चाहते रणबीर आणि आलियाच्या फोटोंची वाट पाहत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, नुकताच मीडिया फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रणबीर हॉस्पिटलमध्ये जात असतानाच्या कारचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहे. तो व्हिडिओ शेअर करून व्हायरलने लिहिले की, 'बाळाचे फोटो मिळणार नाहीत'. त्यामुळे चाहत्यांना आलियाच्या लेकीची झलक पाहायला मिळाली नसली तरी आलियाला पाहायला मिळाल्याचा आनंद आहे.
आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामवर एक सुंदर पोस्ट शेअर करून तिच्या मुलीच्या आगमनाची घोषणा केली तेव्हा चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर खूप शुभेच्छा दिल्या. आई झाल्याबद्दल सर्वांनी तिचे अभिनंदनही केले. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की लग्नाच्या 2 महिन्यांनंतर, दोघांनी घोषणा केली होती की त्यांच्या आयुष्यात एक खास छोटा पाहुणे येणार आहे. जूनमध्ये आलियाने एक फोटो शेअर करून तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Ranbir kapoor