मुंबई, 25 मार्च : सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वच बॉलिवूड सेलिब्रेटी घरी राहून आपल्या कुटुंबांसोबत वेळ घालवताना दिसतात. नेहमीच फॅशनेबल आऊटफिट्स आणि मेकअपमध्ये दिसणारे हे सेलिब्रेटी सध्या स्वतःच्या घरातली काम स्वतः करताना दिसत आहेत. दरम्यान सर्वजण त्यांच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यामातून संवादही साधताना दिसतात. घरच्या घरी फिटनेस जपताना दिसत आहे. पण बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोरा मात्र तिच्या होम क्वारंटाईन काळात आपल्या मैत्रिणींसोबत झोपा काढत आहे.
मलायकानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला. हा एक कोलाज फोटो आहेत. ज्यात तिच्यासोबत करिना कपूर, करिश्मा कपूर, अमृता अरोरा आणि मल्लिका भट या तिच्या बेस्ट फ्रेंड सुद्धा दिसत आहेत. या फोटोमध्ये या पाचही जणी त्यांच्या त्यांच्या घरी झोपलेल्या आहेत असं दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना मलायकानं त्याला कॅप्शन दिलं, ‘बेस्ट फ्रेंड्स होम क्वारंटाईनच्या काळात एकत्र झोपा काढत आहेत.’ यासोबतच तिनं स्टे होम, स्टे सेफ हे हॅशटॅगही वापरले आहेत.
होम क्वारंटाईनमध्ये टायगर नाही तर या खास व्यक्तीला वेळ देतेय दिशा पाटनी!
मलायकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. याला कारण आहे या फोटोवर अर्जुन कपूरनं केलेली कमेंट. अर्जुन कपूरनं गर्लफ्रेंड मलायकाच्या फोटोवर खूपच खास कमेंट केली आहे. त्यानं लिहिलं, ‘झोपेतही तुझ्या चेहऱ्यावरच हसू खूपच सुंदर आहे.’ अर्जुनच्या या कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावरुनच या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे दिसून येतं.
कोणी घासली भांडी तर कोणी पुसली फरशी, Corornavirus नं अशी लावली सेलिब्रेटींची वाट

मलायका आणि अर्जुन हे सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणार कपल आहे. अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. या दोघांच्या वयात तब्बल 11 वर्षांचं अंतर आहे. ज्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोल केलं जातं. सुरुवातीला या दोघांनी त्यांचं नातं सर्वांपासून लपवलं होतं मात्र मागच्या वर्षी या दोघांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. त्यानंतर हे दोघंही अनेकदा एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना दिसतात.
एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत अली-रिचा, शेअर केला रोमँटिक Video मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.