मुंबई, 25 मार्च : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे सध्या संपूर्ण जग ठप्प झालं आहे. या विषाणूनं पूर्ण जगाला विळखा घातला आहे, अनेक सेलिब्रेटींनाही या विषाणूची लागण झाली आहे. भारतातील सर्व बॉलिवूड सेलिब्रेटींच्या सिनेमांचं शूटिंग बंद पडलं असून ते सध्या घरी आहेत. त्यामुळे सर्वजण सध्या त्यांच्या कुटुंबासोबत टाइम स्पेंड करताना दिसत आहेत. अशा बॉलिवूडचं बहुचर्चित कपल टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या हे दोघंही घरी आहेत. मात्र दिशा टायगरसोबत नाही तर दुसऱ्याच एका खास व्यक्तीसोबत क्वारंटाईन टाइम स्पेंड करत आहे.
दिशानं नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत हे व्हिडीओ शेअर करताना तिनं त्याला आम्ही असा एकत्र टाइम स्पेंड करत आहोत असं कॅप्शन दिलं आहे. मात्र या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती टायगर नाही तर त्याची बहीण कृष्णा श्रॉफ आहे. दिशाची टायगरच्या पूर्ण कुटुंबाशी चांगली मैत्री आहे. एवढंच कृष्णा आणि दिशा एकमेकांच्या चांगल्या मैत्रीणी आहेत. सध्या या दोघीही एकत्र टाइम स्पेंड करत आहेत.
एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत अली-रिचा, शेअर केला रोमँटिक Video
दिशानं कृष्णासोबतचा टिकटॉक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये या दोघीही खूप सुंदर दिसत आहेत. दिशानं यावेळी व्हाइट टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातली आहे. विशेष म्हणजे या दोघींनीही कपाळाला टिकली लावली आहे. ज्यात त्या दोघींही खूपच क्यूट दिसत आहेत.
श्रुती हसनच्या घरात पडली फूट? वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत कुटुंबीय
दिशाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच सलमान खानसोबत ‘राधे’ सिनेमात दिसणार आहे. याआधी तिनं भारत सिनेमात सलमानसोबत स्क्रिन शेअर केली होती. याआधी रिलीज झालेला तिचा मलंग सिनेमाही बॉक्स ऑफिसवर चांगला चालला होता. तिचा आगामी सिनेमा ‘राधे’चं दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहे.
हेमा मालिनीकडे दिग्दर्शकानं केली होती बिकिनी सीनची मागणी आणि... मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.