मुंबई, 24 मार्च : कोरोना व्हायरसनं सध्या सगळीकडे थैमान घातलं आहे. ज्यामुळे देशात लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. महाराष्ट्रामध्येही कर्फ्यू लावण्यात आला आहे. ज्यामुळे लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. अशात बॉलिवूड सेलिब्रेटींचीही शूटिंग बंद पडली आहेत. तर काही सेलिब्रेटींच्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता अली फजल आणि रिचा चढ्ढा यांच्यासोबतही काहीसं असंच झालं आहे. हे दोघं एप्रिल महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार असं म्हटलं जात होतं मात्र कोरोनामुळे सध्या ते शक्य नाही. पण हे दोघं मात्र सध्या क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहेत.
लॉकडाउनमुळे सध्या अली आणि रिचा वेगवेगळ्या शहरात अडकले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी राहूनही हे दोघं फोनच्या माध्यमातून प्रेमाचा ओलावा जपताना दिसत आहेत. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून हे दोघंही एकमेकांसाठी वेळ देताना दिसत आहेत. अली फजलनं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात हे दोघंही एकमेकांशी व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसत आहेत.
हेमा मालिनीकडे दिग्दर्शकानं केली होती बिकिनी सीनची मागणी आणि...
अली आणि रिचाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात हे दोघंही आपापल्या घरी एकटे असलेले दिसत आहेत. रिचा अली म्हणते, मला असं वाटतं की मी बऱ्याच दिवसांपासून तुला पाहिलेलं नाही. त्यानंतर अली तिला सांगतो की, त्यानं जेवण बनवायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे रिचा त्याला सांगते मला जेवण बनवायला अजिबात आवडत नाही. पण सध्या मी दिवसातून 3 वेळा जेवत आहे. एकूण काय तर दूर राहूनही दोघंही प्रेमानं एकमेकांची चौकशी करताना दिसत आहेत.
वाह! संकटकाळी व्हिलनच ठरला ‘हिरो’, केलं असं काही की सर्वांना वाटेल अभिमान
अली फजल आणि रिचा चढ्ढा हे दोघंही एप्रिल महिन्याच्या मध्यात लग्न करणार असं बोललं जात होतं मात्र आता कोरोना व्हायरसमुळे त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. सध्याची देशातली परिस्थिती पाहता या दोघांचं लग्न आता वर्षाच्या अखेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऋषी कपूर यांच्या योगा Video वर आलियाची कमेंट, चाहते म्हणतात; 'कपूर घराण्याची...'