मलायकाचा घायाळ करणारा लुक, कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही अर्जुन कपूर

मलायकाचा घायाळ करणारा लुक, कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही अर्जुन कपूर

मलायका अरोरानं नुकतीच वोग ब्युटी अवॉर्ड फंक्शनला हजेरी लावली होती. यावेळी तिनं परिधान केलेल्या ड्रेसमुळे संपूर्ण कार्यक्रमात ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर : फॅशन आयकॉन अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. कधी तिची ड्रेसिंग स्टाईल तर कधी व्हायरल व्हिडीओ आणि अगदीच काही नाही तर अभिनेता अर्जुन कपूरसोबतची रिलेशनशिप. अनेक मलायका अर्जुनला त्याच्या अफेअरमुळे ट्रोल केलं जातं. मात्र ते याकडे दुर्लक्ष करत एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना दिसतात. आताही असंच काहीसं झालं आहे. मलायकानं नुकत्याच सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करण्यापासून अर्जुन कपूर स्वतःला रोखू शकला नाही.

मलायका अरोरानं नुकतीच वोग ब्युटी अवॉर्ड फंक्शनला हजेरी लावली होती. यानंतर तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकउंटवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये मलायकाचा हॉट आणि ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. या अवॉर्ड फंक्शनला मलायकानं व्हाइट कलरचा हाय स्लीट गाऊन परिधान केला होता. यावर सॉफ्ट कर्ल्स, रेड लिपस्टिक आणि हाय हिल्समध्ये मलायका कमालीतची हॉट आणि ग्लॅमरस दिसत होती. यामुळे या संपूर्ण कार्यक्रमात मलायका आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

अनुपम खेर KISS करायला आल्यावर अशी झाली अर्चना पुरणसिंहची अवस्था, पाहा VIDEO

मलायकानं याच ग्लॅमरस लुकचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. ज्यावर युजर्सच्या अनेक प्रतिक्रिया येत होत्या मात्र अर्जुन कपूरच्या कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधलं. त्यानं मलायकाच्या फोटोवर कमेंट करताना फायर इमोजी पोस्ट केला. अर्जुनची ही कमेंट पाहिल्यावर हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत हे लक्षात येतं. त्यांच्या वयातील अंतरामुळे त्यांना नेहमीच ट्रोल केलं जातं मात्र हे दोघंही यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळताना दिसतात.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार सेक्स वर्करच्या भूमिकेत

मलायका आणि अर्जुननं काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नात्याची कबुली दिली. त्यांच्या वयातील अंतरामुळे त्यांना ट्रोल केलं जात असलं तरीही वयाच्या 45 व्या वर्षीही मलायाकाचा फिटनेस तरुण अभिनेत्रीना लाजवेल असाच आहे. हे दोघंही आपापल्या कामातून वेळ काढून एकमेकांसोबत टाइम स्पेंड करताना दिसतात. मागच्या काही काळापासून हे दोघं लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतील अशी चर्चा होती मात्र एका मुलाखातीत इतक्यात लग्नाचा कोणताही विचार नसल्याचं अर्जुननं स्पष्ट केलं आहे.

प्रतीक्षा संपली! बहुचर्चित 'हिरकणी'मध्ये 'ही' अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत

=================================================================

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

First published: September 26, 2019, 4:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading