मुंबई, 26 सप्टेंबर : कुछ कुछ होता है या सिनेमातील मिस ब्रिगेंजा म्हणजेच अभिनेत्री अर्चना पुरणसिंहला सर्वच ओळखतात. सध्या ती कपिल शर्मा शोमध्ये दिसत आहे. आज अर्चना पुरणसिंहचा 57 वा वाढदिवस. अर्चनानं बॉलिवूडमध्ये अनेक अनेक सुपरहीट सिनेमे दिले आहेत. मात्र बॉलिवूडमध्ये ती मुख्य अभिनेत्रीचं स्थान निर्माण करू शकली नाही. मात्र तिच्या अभिनयातून तिनं सर्वांची मनं जिंकली. तिच्या वाढदिवसांच्या निमित्तानं जाणून घेऊयात अर्चना आणि अनुपम खेर यांच्या एका सिनेमातील रंजक किस्सा… शाहरुख खान आणि काजोल यांचा सुपरहिट सिनेमा ‘कुछ-कुछ होता है’ मध्ये मिस्टर मल्होत्रा आणि मिस ब्रिगेंजा यांच्यातील केमिस्ट्रीनं प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. या दोन्ही भूमिका अभिनेता अनुपम खेर आणि अर्चना पुरणसिंह यांनी साकारल्या होत्या. या सिनेमाशिवाय अनुपम आणि अर्चना यांनी 1989 मध्ये ‘लड़ाई’ या सिनेमातही एकत्र काम केलं होतं. ज्यात या दोघांमध्ये एक किसिंग सीन शूट करण्यात येणार होता. या सीनशी संबंधित एक किस्सा काही दिवसांपूर्वीच अर्चना यांनी कपिल शर्मा शोमध्ये शेअर केला. प्रतिक्षा संपली! बहुचर्चित ‘हिरकणी’मध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत हटवण्यात आला पूर्ण सिक्वेन्स अर्चनानं सांगितलं, मी आणि अनुपम ‘लड़ाई’ सिनेमाचं शूटिंग करत होतं. त्यावेळी, दिग्दर्शकानं आमच्यामध्ये एक किसिंग सीन शूट करण्याचं ठरवलं. मला जेव्हा याबद्दल समजलं त्यावेळी मी खूप घाबरले होते. याआधी मी ऑनस्क्रीन एकही किसिंग सीन केला नव्हता. त्यामुळे मी दीपकला फोन केला आणि हा सीन मी करु शकत नाही असं स्पष्ट सांगितलं. मात्र त्यानंतर असं झालं की या सिनेमातून हा संपूर्ण सिक्वेन्स हटवण्यात आला. पण असं का केलं गेलं ते मात्र मला अद्याप समजलेलं नाही. ‘बाला शौतान का साला’, अक्षय कुमारच्या Houseful 4 ची गंमतीशीर पोस्टर्स रिलीज
किरण खेर यांना घाबरले होते अनपम खेर? या शो दरम्यान अर्चना पुरणसिंहनं अनुपम यांना विचारलं की, किरणशी लग्न केल्यानंतर तुम्हाला मला किस करण्याची भीती वाटली होती का? यावर अनुपम म्हणाले, मला या सीनची अजिबात भीती वाटली नव्हती. मात्र मला हा सीन करणं कम्फर्टेबल वाटत नव्हतं. त्यामुळे मी दीपकला विनंती केली की हा सीन या सिनेमातून काढून टाकावा. हा फक्त एका सिनेमातील किस्सा होता. मात्र अर्चना आणि अनुपम यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं आणि या दोघांची जोडी प्रेक्षकांमध्ये हिट झाली. सलमान खान बिग बॉस म्हणून झळकण्याचे किती कोटी घेतो ऐकून व्हाल थक्क ============================================================== VIDEO: मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीचं रौद्र रूप; जनावरांसह ग्रामस्थांचं स्थलांतर