जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार सेक्स वर्करच्या भूमिकेत

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार सेक्स वर्करच्या भूमिकेत

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार सेक्स वर्करच्या भूमिकेत

आत्ता पर्यंत या अभिनेत्रीनं अनेक हटके भूमिका साकारल्या असून या सिनेमात ती एका कमर्शिअल सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 26 सप्टेंबर : बॉलिवूडमध्ये सध्या टिपिकल विषयांवर सिनेमा तयार करण्यापेक्षा थोड्या हटके आणि वेगळ्या विषयांवर सिनेमांची निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. यातून सामाजिक विषयांवर भाष्य करत लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. लवकरच बॉलिवूडच्या एका सिनमात ‘सेक्स वर्कर’ हा विषय थोड्याशा हटके प्रकारे हाताळला जाणार आहे. ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमात बॉलिवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री सेक्स वर्करची भूमिका साकरणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चढ्ढा तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. नुकताच तिचा ‘आर्टिकल 375 ’ सिनेमा रिलीज झाला ज्यात ती एका वकिलाच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर आता ऋचा ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनुभव सिन्हा करणार असून या सिनेमातील ऋचाची भूमिका खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. ती या सिनेमात एका कमर्शिअल सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे. इतकंच नाही तर ऋचा या सिनेमातील तिच्या भूमिकेसाठी तयारी सुद्धा सुरू केली आहे. ‘बाला शौतान का साला’, अक्षय कुमारच्या Houseful 4 ची गंमतीशीर पोस्टर्स रिलीज

    जाहिरात

    नुकत्याच दिलेल्या एका मुलाखातीत ऋचा म्हणाली, अनुभव सिन्हा यांचा हा सिनेमा एक ब्लॅक कॉमेडी आहे. सध्या प्रत्येक प्रकारची भूमिका साकारावी याकडे माझा कल आहे. यातून मी माझ्या क्षमता तपासून पाहत आहे. अनुभव सिन्हा यांच्या या सिनेमासाठी मी कॉमेडी करत आहे. मी सोफी नावाच्या एका मुलीची व्यक्तिरेखा साकरत आहे. जी बोलताना सतत अडखळत असते, जिच्या शब्दांचे उच्चार स्पष्ट नसतात. सलमान खान बिग बॉस म्हणून झळकण्याचे किती कोटी घेतो ऐकून व्हाल थक्क

    ऋचा सांगते, ‘सेक्शन 375’ नंतर या सिनेमात वेगळी भूमिका साकरता येत असल्यानं मला खूप आनंद होत आहे. लोक मला नेहमी पेक्षा काहीतरी वेगळं करताना पाहणार आहेत. अनुभव सिन्हा यांचा ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ मध्ये मी एका क्रेझी मुलीची भूमिका साकारत आहे. कॉमेडी मला खूप आवडते आणि मी काम करताना खूप एंजॉय सुद्धा करते. अनेकदा मी कॉमेडी करताना अधिकाधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते.

    जाहिरात

    ऋचा चढ्ढानं सेक्शन 375 मध्ये एका वकीलाची भूमिका साकारली होती. या सिनेमात तिच्यासोबत अक्षय खन्ना, राहुल भट्ट, मीरा चोपड़ा, दिव्येंदु भटाचार्य या कलाकरांच्या म्हत्त्वाच्या भूमिका होत्या. या सिनेमाला समीक्षकांकडून चांगले रिव्ह्यू मिळाले होते. या सिनेमाचं दिग्दर्शन अजय बहलनं केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नव्हता. ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ शिवाय ऋचा चढ्ढा अश्विनी अय्यर तिवारी यांच्या स्पोर्ट्स ड्रामा ‘पंगा’मध्ये  दिसणार आहे. रानू मंडल यांच्यावर होतेय बायोपिकची निर्मिती, ही अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत ======================================================== VIDEO: मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीचं रौद्र रूप; जनावरांसह ग्रामस्थांचं स्थलांतर

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात