मुंबई, 25 सप्टेंबर : सध्या मराठी सिनेमांमध्येही वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. 'कच्चा लिंबू' या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर उत्सुकता आहे ती प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकरणी' या सिनेमाची... या चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं होतं. मात्र यात हिरकणीची भूमिका कोण साकरणार याचा उलगडा झाला नव्हता. ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे होती. पण आता या सिनेमचं दुसरं मोशन पोस्टर रिलीज झालं असून हिरकणी विषयीची प्रेक्षकांची प्रतिक्षा आता संपली आहे.
आता या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे कारण ‘हिरकणी’ सिनेमाचे मुख्य पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित ‘हिरकणी’चे नवीन पोस्टर नुकतेच पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर येथे प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमधून प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाठ्यपुस्तकातील हिरकणीला रुपेरी पडद्यावर साकारणार आहे आणि सोनालीच्या माध्यमातून हिरकणीला मिळालेला चेहरा लोकांच्या नक्कीच कायमस्वरुपी स्मरणात राहील याची खात्री आहे.
सलमान खान बिग बॉस म्हणून झळकण्याचे किती कोटी घेतो ऐकून व्हाल थक्क
विशेष म्हणजे अभिनेते सचिन खेडेकर यांनी मोशन पोस्टरला आवाज दिला आहे. या पोस्टर प्रदर्शनाच्या वेळी सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर, प्रसाद ओक, राजेश मापुस्कर, लॉरेन्स डिसुझा उपस्थित होते. चतु:श्रृंगी मंदिरात प्रमुख भूमिकेचं पोस्टर लाँच करुन ‘हिरकणी’ टीमने देवीचे दर्शन घेतले.
रानू मंडल यांच्यावर होतेय बायोपिकची निर्मिती, ही अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत
इरादा एंटरटेन्मेंटच्या फाल्गुनी पटेल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. लॉरेन्स डिसुझा सहनिर्माते आहेत. तर राजेश मापुसकर यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी निभावली आहे. स्वरूप एंटरटेनमेंटचे आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार हे या चित्रपटासाठी मार्केटिंगचे काम पाहत आहेत. येत्या दिवाळीत म्हणजेच 24 ऑक्टोबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड सुपरस्टारनं शेअर केला थ्रोबॅक फोटो, ओळखा पाहू कोण आहे 'हा' अभिनेता
===============================================================
VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा