मुंबई, 30 जून- गेल्या काही दिवसांपासून सलमान खान सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय आहे. दररोज तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. नुकताच त्याने अजून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो आपल्या कुटुंबातील कोणत्या एखाद्या व्यक्तिसोबत वेळ घालवताना किंवा सिनेमाचं चित्रीकरण करताना दिसत नाहीये तर तो एका माकडाला पाणी पाजताना दिसत आहे.
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, सलमान स्वतः पाणी पीत आहे आणि त्यानंतर तो माकडाला पाणी पाजत आहे. पण माकड पाण्याची बॉटल घेत नाही. यानंतर सलमान त्याला कपात पाणी भरून देतो. कपातलं पाणी ते माकड पितं. हा व्हिडिओ पाहताना माकडाला जणूकाही त्या प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायचंच नव्हतं. त्याची हीच इच्छा सलमान खान पूर्ण करतो आणि त्याला कपातून पाणी प्यायला देतो.
भारत- इंग्लंड सामन्यात ऋषी कपूर यांनी केले मजेशीर ट्वीट, पाकिस्तानी चाहते भडकले
हा व्हिडिओ शेअर करताना सलमानने लिहिले की, ‘आमच्या बजरंगी भाईजानला प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायचं नाही.’ यावेळी सलमान नक्की कुठे फिरत आहे हे या व्हिडिओमधून स्पष्ट झालेलं नाही. पण या व्हिडिओत माकड आरामात बसून केळं खाताना आणि पाणी पिताना दिसत आहे.
19 हजारांमधून झाली होती निवड, आता Zaira Wasim ला झालंय तरी काय?
सलमानच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो दबंग ३ सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. यात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका आहे. प्रभू देवाचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. शिवाय पुढच्या वर्षाचा ईदही त्याच्या नावावर बुक आहे. पुढच्या वर्षी ईदच्या मुहुर्तावर संजय लीला भन्साळी दिग्दर्शित इंशाअल्लाह प्रदर्शित होणार आहे. यात सलमानसोबत आलिया भट्ट दिसणार आहे.
जर टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप, तर विराटला बॉलिवूडकडून मिळेल सर्वात मोठी भेट
VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा