न्यूयॉर्क, 30 जून- ICC World Cup 2019 मध्ये इंडिया आणि इंग्लंडमध्ये सामना सुरू आहे. या सामन्याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे. स्वतः ऋषी कपूर हे क्रिकेटचे किती मोठे चाहते आहेत हे काही वेगळं सांगायची गरज नाही. सध्या आपल्या आजारावर ते न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असले तरी भारतातील प्रमुख घडामोडींकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. सध्या बॉलिवूडच्या या चिंटूचं ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सामना सुरू होण्यापूर्वी त्यांनी हे ट्वीट केलं.
या ट्वीटमध्ये त्यांनी असं काही लिहिलं की लोक ते वाचून हैराण झाले. ऋषी यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, आज सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा विजय व्हावा यासाठी पाकिस्तानी चाहते देवाकडे प्रार्थना करत असतील. ऋषी यांनी यामागचं कारणही स्पष्ट केलं. विशेष म्हणजे ऋषी यांच्यासारखं विधान कर्णधार विराट कोहलीनेही केलं आहे.
जर टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप, तर विराटला बॉलिवूडकडून मिळेल सर्वात मोठी भेट
ऋषी कपूर यांनी 29 जूनला एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘रविवारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील आय़सीसी वर्ल्ड कप सामना फार खास असणार आहे. १.२ अब्ज भारतीय आणि 200 दशलक्ष पाकिस्तानी, १५० दशलक्ष बांग्लादेशी आणि २५ दशलक्ष श्रीलंकन चाहते भारताच्या विजयासाठी प्रार्थना करतील. जर या सामन्यात भारताचा पराभव झाला तर पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका हे तीनही संघ वर्ल्ड कपच्या शर्यतीतून बाहेर पडतील.’
ऋषी यांच्या या ट्वीटवर एका पाकिस्तानी चाहत्याने नकारात्मक कमेंट केली आहे. एका युझरने लिहिले की, ‘आम्ही बाद झालो तरी चालेल पण भारतासाठी प्रार्थना करणार नाही. आम्हाला भारताकडून कोणतेही उपकार नकोत. आम्ही भारताला कधीच पाठिंबा देणार नाही.’ तर दुसऱ्या एका युझरने लिहिले की, ‘पाकिस्तानी चाहते भारताच्या विजयासाठी नाही तर इंग्लंडच्या पराभवासाठी प्रार्थना करत आहेत.’
19 हजारांमधून झाली होती निवड, आता Zaira Wasim ला झालंय तरी काय?
याआधीही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलताना म्हटला होता की, आजच्या भारत आणि इंग्लंडमधील सामन्यावर पाकिस्तानी चाहत्यांचंही लक्ष असणार आहे. तसेच पाकिस्तानी क्रिकेटचे चाहते भारताला पाठिंबा दर्शवतील असा विराटला विश्वास आहे.
VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा