मुंबई, 06 मे: अभिनेत्री मलायला अरोरा (Malaika Arora Accident) अलीकडेच तिच्या अपघातामुळे चर्चेत आली होती. तिच्या अपघातामुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती पण काहीच दिवसात अभिनेत्री कामावर परतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री किरकोळ जखमी झाली होती. 02 एप्रिल रोजी पुण्याहून परतताना ही घटना घडली होती. पंधरा दिवसांनी मलायका कामावर परतली पण तिच्या कपाळावर जखमेच्या खुणा अजूनही आहेत. दरम्यान मलायकाने अलीकडेच दिलेलया मुलाखतीत तिच्या अपघाताविषयी शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने यावेळी असे म्हटले आहे की, 'मला आजही ती भयंकर रात्र आठवते आहे जेव्हा माझ्या आजुबाजूला रक्ताचा सडा होता. अपघातानंतर मी केवळ दोन गोष्टींसाठी प्रार्थना करत होते. एक की त्या रात्री मला मरण अपेक्षित नव्हतं आणि दुसरं म्हणजे मला माझी दृष्टी जायला नको होती.' एबीपी लाइव्हने याविषयी वृत्त दिले आहे.
हे वाचा-VIDEO: नव्या जाहिरातीमुळे विकी कौशल चर्चेत, नेटकऱ्यांना आठवला सलमान खान
अभिनेत्रीने रुग्णालयातील देखील अनुभव सांगितला. ती म्हणते की, अपघातानंतर तिच्या आजुबाजूच्या लोकांनी सांगितले की ती सातत्याने तिच्या आईची आणि मुलगा अरहानची आठवण काढत होती. याशिवाय ती सोमवारी सेटवर परत जाण्याबाबतही बोलत होती. हा अपघात शनिवारी झाला होता. अभिनेत्री म्हणते की सोमवारी तर नाही पण 15 दिवसांनी ती शूटिंगसाठी परतली होती.
View this post on Instagram
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक झालं होतं. त्यावेळी काही गाड्या एकमेकांना धडकल्या. तीन-चार गाड्यांची टक्कर झाली. खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला होता. अपघात झालेल्या गाड्यांमध्ये मलायकाची कारही होती. गाडीला अपघात झाला तेव्हा मलायका गाडीत होती. अपघातात ती जखमी झाली होती. सुदैवाने थोडक्यात ती बचावली. तिला लगेच नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.
हे वाचा-Alia Bhatt कधी सुरू करणार तिच्या हॉलिवूड डेब्यूचे शूटिंग? कोण-कोण असणार स्टार्स?
मलायका आणि अर्जुन लवकरच करणार लग्न?
मलायका अरोराने असं म्हटलं आहे की ती आणि अर्जुन कपूर त्यांच्या रिलेशनशिपच्या भविष्याचा विचार करत आहेत. तिने असं म्हटलं आहे की, अर्जुनच तिचा 'Man of Life' आहे आणि ते दोघं नेहमी त्यांच्या नात्याबाबत विचार करत असतात. दोघांमधील वयाच्या अंतरामुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगची शिकार व्हावं लागलं आहे मात्र तरीही ते दोघं कपल गोल्स देण्यात कुठेही मागे नाहीत. बाँबे टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मलायकाने तिच्या आणि अर्जुन कपूरच्या नात्याबाबत भाष्य केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Malaika arora