मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Alia Bhatt कधी सुरू करणार तिच्या हॉलिवूड डेब्यूचे शूटिंग? कोण-कोण असणार स्टार्स?

Alia Bhatt कधी सुरू करणार तिच्या हॉलिवूड डेब्यूचे शूटिंग? कोण-कोण असणार स्टार्स?

आलियाच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाची प्रतीक्षा सर्वांना आहे तर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचे शूटिंगही लवकरच पूर्ण हईल. यानंतर आलिया तिच्या हॉलिवूडमधील पदार्पणाच्या मुव्हीवर (Alia Bhatt Hollywood Debut Movie) काम सुरू करणार आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 06 एप्रिल: अभिनेता रणबीर कपूर याच्याशी लग्न केल्यानंतर लगेचच अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt and Ranbir Kapoor Wedding) तिच्या अपकमिंग प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र झाली आहे. तिच्या काही सिनेमांचे शूटिंग पूर्ण होऊन ते रीलिजच्या मार्गावर आहेत तर काही सिनेमांचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. आलियाच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाची प्रतीक्षा सर्वांना आहे तर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचे शूटिंगही लवकरच पूर्ण हईल. यानंतर आलिया तिच्या हॉलिवूडमधील पदार्पणाच्या मुव्हीवर (Alia Bhatt Hollywood Debut Movie) काम सुरू करणार आहे.

आलिया भट्ट तिच्या हॉलिवूडचा डेब्यू सिनेमा 'हार्ट ऑफ स्टोन' चे शूटिंग मे च्या मध्यात सुरू करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार याकरता ती यूकेसाठी रवाना होईल. यामध्ये ती गॅल गॅडोट  आणि जेमी डॉर्नन यांच्यासह स्क्रीन शेअर करणार आहे. पिंकव्हिलाने याविषयी वृत्त दिल आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर या डिटेक्टिव्ह थ्रिलरच्या शूटिंगची सुरुवात करणार आहे.

हे वाचा-VIDEO: नव्या जाहिरातीमुळे विकी कौशल चर्चेत, नेटकऱ्यांना आठवला सलमान खान

आलियाकडे आहे प्रोजेक्ट्सची रांग

'ब्रह्मास्त्र', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' किंवा 'हार्ट ऑफ स्टोन' एवढेच नव्हे, तर आलिया आणखीही एका महत्त्वाच्या सिनेमात दिसणार आहे. हॉलिवूड डेब्यू असणाऱ्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यावर आलिया फरहान अख्तरचा सिनेमा 'जी ले जरा' वर काम करण्यास सुरुवात करणार आहे, अशी माहिती मिळते आहे. मीडिया रिपोर्टनुसार या सिनेमाचे शूटिंग सप्टेंबर महिन्यात सुरू होऊ शकते. या सिनेमात आलियासह प्रियंका चोप्रा जोनास आणि कतरिना कैफ या अभिनेत्री देखील असणार आहेत. याशिवाय पुढील वर्षाच्या सुरुवातीला आलिया संजय लीला भंसाळी यांच्यासह 'बैजू बावराँ' या सिनेमावर देखील काम करण्यास सुरुवात करणार आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood actress, Hollywood