मुंबई, 6 मे- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं आहे. या अभिनेत्याने विविध धाटणीच्या भूमिका साकारत आपली एक खास ओळख बनवली आहे. विकी आज बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. विकी सध्या आपल्या एका जाहिरातीमुळे (New Ad) फारच चर्चेत आहे. ही जाहिरात पाहून अनेकांना सलमान खानची आठवण होत आहे. विकी कौशल हा एक उत्तम अभिनेता आहे. ज्याने आपल्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. विकीचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. चित्रपटांसोबतच तो अनेक जाहिरातींमध्येही दिसून येतो. सध्या, तो ‘थम्स अप’ ब्रँड नवीन कोल्ड ड्रिंक ‘चार्ज्ड’ या जाहिरातीत दिसत आहे. अभिनेत्याची ही जाहिरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या जाहिरातीच्या प्रोमो व्हिडिओमध्ये, विक्की कौशल पांढऱ्या टी-शर्टवर हुडी घातलेला दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये, जेव्हा अभिनेत्या कुणाकडे चार्जर मागतो तेव्हा तो त्यांना ‘चार्ज्ड’ कोल्ड ड्रिंक देतो. त्यानंतर अभिनेता मोठ्या स्टाईलने कोल्ड्रिंकची बाटली पकडतो आणि मोठ्या स्वॅगने पितो.असा हा जाहिरातीचा प्रोमो पाहायला मिळत आहे.
विकीचा हा प्रोमो व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ते कमेंट करून व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. प्रोमो व्हिडिओमुळे काही यूजर्स विकीची खिल्ली उडवत आहेत. एका नेटिझनने लिहिले की, ‘सलमान खानकडून त्याच्या गर्लफ्रेंडला हिसकावून घेतल्यानंतर त्याची जाहिरातही हिसकावण्यात आली’. कतरिना कैफबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री लग्नापूर्वी सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं नेहमीच सांगितलं जातं. या गोष्टींचा विचार करून नेटिझन्स अशा कमेंट करत आहेत. तर विकी कौशलने ‘चार्ज्ड’ कोल्ड्रिंकची जाहिरात केली आहे. जी सलमान खानच्या जाहिरातीपेक्षा वेगळी आहे. .‘‘थम्स अप’ जाहिरातीत सलमान खानसोबत शाहरुख खानही दिसत आहे.