मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /राजमहाल सोडला, पळून जाऊन केलं लग्न, बॉलिवूडला धुडकावणारी अभिनेत्री आता 2मुलांची आई

राजमहाल सोडला, पळून जाऊन केलं लग्न, बॉलिवूडला धुडकावणारी अभिनेत्री आता 2मुलांची आई

bhagyashree

bhagyashree

प्रेम, सिनेमा आणि त्यानंतर लग्नानंतर भाग्यश्रीचं आयुष्य कसं बदललं हे तिनं एका मुलाखतीत सांगितलं. मैंने प्यार कियाच्या हिरोईनचं लव्ह लाईफ फारच रंजक होती.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 मार्च : मैंने प्यार कियाची सक्सेसफुल अभिनेत्री भाग्यश्रीनं एकेकाळी बॉलिवूड गाजवलं होतं. एका रात्रीत स्टार होणारी अभिनेत्री म्हणून भाग्यश्रीचं नाव होतं. केवळ प्रेक्षकांनी नाही तर सिने समीक्षकांनी देखील भाग्यश्रीचं कौतुक केलं होतं. तिच्या निरागस अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ घातली. कबूतर जा हे गाणं तर त्यावेळी चांगलंच गाजलं. सलमान खान आणि भाग्यश्रीची जोडी एका रात्रीच हिट झाली. भाग्यश्री बॉलिवूडची भविष्यातील मोठी स्टार असेल असं अनेकांनी म्हटलं होतं. पण अभिनेत्रीनं एका सिनेमा सिनेमात सक्सेस मिळवून, मोठा चाहता वर्ग निर्माण करून बॉलिवूड राम राम ठोकला. प्रेमासाठी बॉलिवूड सोडून तिनं हामालय दसानी या तिच्या बॉयफ्रेंडबरोबर संसार थाटला. प्रेम, सिनेमा आणि त्यानंतर लग्नानंतर भाग्यश्रीचं आयुष्य कसं बदललं हे तिनं एका मुलाखतीत सांगितलं.

मैंने प्यार कियाची भाग्यश्री म्हणून आजही अभिनेत्रीच ओळख आहे.  एका मुलाखतीत तिनं बॉयफ्रेंड ते नवरा, तो तिला कसा भेटला याबद्दल सांगितलं. ह्यूमन्स ऑफ बॉम्बेला तिनं दिलेल्या एका मुलाखतीत तिनं म्हटलं होतं का, "हिमालय माझं शाळेतलं प्रेम. आम्ही एकाच शाळेत होतो. तो वर्गातील मस्तीखोर मुलगा होता आणि मी वर्गाची मॉनिटर होते.  आमची नेहमी भांडणं व्हायची. पण आम्ही जितके एकमेकांशी भांडायचो तितकंच आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे देखील आम्हाला माहिती होतं. शाळा संपत आली. शाळेच्या शेवटच्या दिवशी आमच्या मनातील भावना अखेर समोर आल्या".

हेही वाचा - राज कपूर यांना सोडून त्यांची पत्नी राहू लागली होती हॉटेलमध्ये, नरगिस-जीनत नाही तर 'या' अभिनेत्रीमुळं संसाराचे वाजले होते तीनतेरा

भाग्यश्री पुढे म्हणाली,  "तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मला तुझ्याशी काही तरी बोलायचं आहे. त्याला खरंतर माझ्याशी खूप दिवसांपासून बोलायचं होतं. पण तो कसं बोलू याची प्रॅक्टिस करत होता. पण कधीच माझ्यासमोर येऊन बोलू शकला नाही. शाळेच्या शेवटच्या दिवशी अखेर मीच त्याच्यासमोर उभी राहून त्याला म्हटले, जे बोलायचं आहे ते स्पष्ट बोलं. त्यावर तो मला म्हणाला, मला तू आवडतेस आणि तुझं उत्तरही पॉझिटिव्ह असेल अशी मला आशा आहे".

भाग्यश्रीचा जन्म 23 फेब्रुवारी 1969साली एका मराठी राज घराण्यात आला. तिचे वडील सांगलीचे मोठे राजा होतो. भाग्यश्री आणि हिमालयच्या अफेअर्सबद्दल तिच्या कुटुंबाला कळल्यानंतर त्यांनी दोघांच्या नात्याला प्रचंड विरोध केला. भाग्यश्री म्हणाली, "आम्ही दोघे तेव्हा कॉलेजमध्ये होतो. तेव्हा गपचूप भेटायचो किंवा फोनवर बोलायचो.  मी माझ्या कुटुंबाला आमच्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी, असा कोणताही निर्णय घेण्यासाठी तुम्ही अजून लहान आहात, असं म्हणत माझं बोलणं धुडकावलं".

हेही वाचा - दरवाजा तोडून बाहेर काढावा लागला मृतदेह; मृत्यूच्या काही तास आधी गुरू दत्तबरोबर नेमकं काय घडलं?

"तेव्हा मी हिमालयला सांगितलं की, आपण खरंच एकमेकांवर इतकं प्रेम करत असू तर आपण काही दिवस एकमेकांपासून दूर राहायला हवं. आपण खरंच एकमेकांवर प्रेम करतो का किंवा आपण खरंच एकमेकांचे होऊ शकतो का हे कळेल. त्यानंतर आम्ही ब्रेकअप केलं. त्यानंतर हिमालय शिक्षणासाठी अमेरिकेला गेला आणि मी इथे मैंने प्यार किया हा सिनेमा साइन केला", असं भाग्यश्री म्हणाली.

भाग्यश्रीचे आई वडील तिला हिमालयला भेटूही देत नव्हते की त्याच्याशी फोनवर बोलूही देत नव्हते.  पण एकेदिवशी तिनं कुटुंबाच्या विरोधात जाऊन "मला हिमालयबरोबर असताना आनंद मिळतो. त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही", असं ठणकावून सांगितलं. भाग्यश्रीच्या आई वडिलांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती.

एकदिवस भाग्यश्री वैतागली. आई-वडील लग्नासाठी कधीच तयार होणार नाहीत हे तिला कळून चुकलं होतं. तिनं हिमालयला फोन केला आणि म्हणाली, "मी माझं घर सोडतेय. मी माझ्यावर प्रेम करत असलास तर 15 मिनिटांत मला घ्यायला माझ्या घरी ये". त्यानंतर भाग्यश्रीनं हिमालयचे आई-वडील, अभिनेता सलमान खान, सूरज बडजात्या आणि काही मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत एका मंदिरात लग्न केलं.

मैंने प्यार किया सिनेमाच्या रिलीजनंतर लगेचच भाग्यश्रीनं लग्न केलं. तेव्हा ती बॉलिवूडची स्टार अभिनेत्री झाली होती. पण तिनं वडिलांसाठी बॉलिवूड सोडलं.  भाग्यश्री आता 54 वर्षांची आहे. तिला 2 मुलं आहेत. मुलगी अवंतिका दसानी आणि मुलगा अभिमन्यू दसानी. दोघे अभिनय क्षेत्रात सक्रीय आहेत. तर नवरा हिमालय दसानी एक बिझनेसमन आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News