मुंबई, 26 मार्च- राज कपूर यांचं लग्न झालं होतं तरी देखील त्याचं एका अभिनेत्रीसोबत सुत जुळ्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगली होती. नरगिस आणि जीनत अमान यांच्यासोबतचं त्यांचं प्रेमुप्रकरण तर कोणापासून लपलेल नाही. पण असं असताना देखील राज कपूर वैजयंती माला यांच्या प्रेमात देखील पडले होते. जेव्हा ही गोष्ट त्यांची पत्नी कृष्णा यांच्या कानावर पडली तेव्हा त्या खूप चिडल्या होत्या.
असं म्हणतात की, वैजयंती माला यांच्यामुळे राज कपूर यांची पत्नी कृष्णा या दोन महिने घर सोडून गेल्या होत्या. अभिनेत्रीनं ‘नया दौर’, ‘आशा’, ‘साधना’ आणि ‘गंगा जमुना’ यासारख्या सिनेमात काम केलं आहे. त्यांनी पडद्यावर जास्तीत जास्त आर्टिस्टिक अशा भूमिका साकारल्या. पण त्या राज कपूर यांच्या एका सिनेमात स्वीमसूटमध्ये दिसल्या होत्या. यासाठी राजकपूर यांनी त्यांच्या खूप विनंत्या केल्या होत्या. तेव्हा कुठं त्यांनी सिनेमात स्वीमसूट घातला होता.
वाचा-मृत्यूच्या काही तासापूर्वी कोणाच्या बर्थडे पार्टीत गेली होती आकांक्षा दुबे?
वैजयंती माला पहिल्या साउथ इंडियन अभिनेत्री होत्या ज्यांनी सिनेमात स्वीमसूट घातला होता. ‘बोल राधा बोल’ या गाण्यात त्यांनी सिनेमात स्वीमसूट घातला होता. या गाण्यात त्यांनी स्वीमसूट घालावा म्हणून राज कपूर वैजयंती माला यांच्या आजींना भेटले होते. यासाठी त्यांनी त्यांच्या आजीची परवानगी घेतली होती. यानंतरच त्यांनी . ‘बोल राधा बोल’ या गाण्याचं शूटींग केलं होत. असं म्हणतात की, संगम सिनेमाच्या शुटींगवेळी राज कपूर आणि वैजयंती यांच्यात जवळीकता वाढली होती. ही गोष्ट राज कपूर यांच्या पत्नीच्या कानावर गेल्या नंतर कृष्णा ह्या खूप नाराज झाल्या होत्या. मग काय कृष्णा यांनी रागनं राज कपूर यांचं घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घर सोडलं आणि हॉटेलमध्ये राहू लागल्या. ऋषी कपूर यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकात या किस्साबद्दल लिहिण्यात आलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ऋषी कपूर यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलं आहे की, मी आईसोबत मुंबईमधील मरीन ड्रायव्हच्या नटराज हॉटेलमध्ये राहण्यास गेल्या होत्या. हा काळ तो होता जेव्हा राज कपूर आणि वैजयंती यांच्यात प्रेम फुलतं होतं. राज कपूर यांना याबद्दल समजलं तेव्हा त्यांनी पत्नी आणि मुलांना राहण्यासाठी एक अपार्टमेंट दिलं होतं. अभिनेत्यानं पत्नीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण कृष्णा या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्यांनी ठरवलं होतं की, जोपर्यंत वैजयंती या राज कपूर यांच्या आय़ुष्यातून जात नाहीत तोपर्यंत त्या घराची पायरी चढणार नाहीत.
>
राज कपूर यांनी 22 व्या वर्षी कृष्णा मल्होत्रा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांना पाच मुलं होती.रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि जीव कपूर तर मुलींचे नाव नंदा कपूर आणि रीमा कपूर अशी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment