मुंबई, 22 मार्च : हिंदी सिनेसृष्टीत असे फार कमी कलाकार आहेत ज्यांना सिनेसृष्टीचा मजबूत आधार स्तंभ मानलं जातं. त्यातील एक नाव म्हणजे प्रसिद्द अभिनेते गुरू दत्त. त्यांच्यात सिनेमाचं एक चालतं बोलतं विद्यापिठ होतं असं म्हटलं जातं. सिनेमाचं शिक्षण घेणाऱ्या सगळ्याचं विद्यार्थ्यांना गुरू दत्त यांच्या सिनेमातून अनेक गोष्टी शिकता येतात. अभिनयाबरोबरच एक दर्जेदार लेखक, दिग्दर्शक आणि निर्माती क्षेत्रात गुरू दत्त यांनी आपलं नाव कमावलं. पण अशा या महान अभिनेत्याच्या आयुष्याचा शेवट मात्र फार विचित्र पद्धतीनं झाला. वयाच्या केवळ 39व्या वर्षी गुरू दत्त यांनी जगाचा अकस्मात निरोप घेतला. त्यांच्या खोलीत त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचा मृत्यू आजही एक रहस्य आहे. गुरू दत्त यांच्या मृत्यूच्या रात्री नेमकं काय घडलं? पाहूयात.
गुरू दत्त यांनी करिअरमध्ये नाव कमावलं पण त्यांच्या मृत्यूनंतर त्याचं नाव अशा कलाकारांच्या यादीत आलं ज्याच्या मृत्यूचा उलगडा आजही होऊ शकला नाहीये. वयाच्या 39व्या वर्षी गुरू दत्ता यांचा मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केली असं म्हटलं जातं. पण मृत्यूच्या रात्री नेमकं काय घडलं याविषयी त्यांचे जवळचे मित्र आणि त्यांच्या सिनेमाचे लेखक अबरार अल्वी यांनी त्यांच्या 'टेन इयर्स विथ गुरू दत्त' या पुस्तकात लिहिलं आहे.
9 ऑक्टोबर 1964 म्हणजेच गुरू दत्त यांच्या मृत्यूच्या ठिक एक दिवस आधी आर्क रॉयलमध्ये 'बहारे फिर भी आएंगी' या सिनेमातील नायिकेच्या मृत्यूच्या सीनवर काम करत होते. संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास गुरूदत्त यांच्या आजूबाजूचं वातावरण बदललं होतं. गुरू दत्त दारूच्या नशेत पुरते बुडाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच तणाव होता. अबरार यांनी गुरूचा हेल्पर रतनला विचारलं की काय झालं? त्यावर त्यानं सांगितलं की, गुरू दत्त आणि त्याची पत्नी गीता दत्त यांच्यात सध्या वाद सुरू आहेत. त्यांचं नात त्या वेळेस शेटवच्या टप्प्यात होतं. दोघांमध्ये सतत भांडणं होतं. गुरू दत्तच्या खासगी आयुष्यात खुप तणाव होते.
त्या रात्री गुरू दत्त आणि त्यांच्या बायकोमध्ये चांगलंच भांडणं झालं होतं. गीताने दोन्ही मुलांना गुरूला भेटण्यासाठी पासून मनाई केली होती. गुरू दत्तनं रात्री दारूच्या नशेत असताना गीताला फोन केला. दोन्ही मुलांना माझ्याकडे पाठव असं सांगितलं पण रात्र खूप झाल्यानंतर गीताने मुलांना त्याच्यांकडे पाठवलं नाही. अबरार यांनी सांगितलं, फोनवर दोघांचं भांडणं झालं. तेव्हा रागाच्या भरात गुरू दत्तनं, 'जर मला मुलांना पाहायला मिळालं नाही तर तु माझं मेलेलं प्रेत पाहशील', असं गीता दत्तला म्हटलं होतं. गीता दत्त देखील तेव्हा रागात होत्या. त्यांना देखील गुरूची ही शेवटची रात्र असेल असं वाटलं नव्हतं.
गुरूदत्त यांनी दारूच्या नशेत स्वत:वरचं नियंत्रण गमावलं होतं. त्यांनी फक्त दारूचे पेग घेण्याचं ठरवलं आणि त्या रात्री काहीच जेवणं खाल्लं नाही. रात्री उशिरा सिनेमा विषयी बोलणं झालं. अबरार यांनी गुरूला 'मला तुझ्याशी बोलायचं आहे', असं सांगितलं पण 'मला झोप आली' असल्याचं सांगून त्यांनी टाळलं. गुरू दत्त नेहमीच लेखन, सीन्स, संवाद झाल्यावर ते पाहायचे त्यात काही बदल करायचे असल्यास अबरारला सांगायचे पण त्या रात्री त्यांनी असं काहीच न करता थेट झोप आल्याचं सांगून बेडरूमचा रस्ता धरला.
रात्री 3 वाजता गुरू दत्त त्यांच्या रूममधून बाहेर आले आणि त्यांनी हेल्पर असलेल्या रतनला विस्की देण्यासाठी सांगितलं पण रतननं विस्की देण्यास नाही म्हटल्यावर गुरू दत्तनी दारूची संपूर्ण बाटली घेऊन बेडरूममध्ये गेले. त्यानंतर बेडरूममध्ये काय झालं हे कोणालाही माहिती नाही. 10 ऑक्टोबरलाच्या सकाळी गुरूदत्त बेडरूममध्ये मृतास्थेत सापडले.
10 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता गुरू दत्तचे डॉक्टर त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा गुरू दत्त झोपले आहे असं समजून परत निघून गेले. त्याच वेळी गीता दत्त हेल्पर रतनला सातत्यानं फोन करत होती. गुरू दत्त खूप वेळ झोपले आहे म्हणून गीता फोन करत आहेत असं त्याला वाटलं. पण गुरू दत्तची पत्नी गीताला काहीतरी अघटीत घडल्याची कुणकूण लागली होती. सकाळी 11 वाजता गीता गुरूच्या घरी आल्या आणि त्यांनी रतनला रूमचा दरवाजा तोडायला सांगितला. दरवाजा तोडल्यानंतर गुरू दत्त अंथरूळात होते.
अबरार यांनी सांगितलं, गुरू दत्त 10 ऑक्टोबरच्या सकाळी आर्क रॉयलच्या रूममध्ये शांतपणे झोपले असल्याचं समोर आलं पण त्याच्या बाजूला एक छोटी काचेची बाटली होती ज्यात गुलाबी रंगाचं द्रव्य पदार्थ होतं. गुरू दत्तच्या तोंडातून फेस आला होता आणि अबरार यांना तेव्हाच कळलं होतं की गुरू दत्त यांचा मृत्यू ही एक आत्महत्या आहे. त्यांनी स्वत:ला मारलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News