जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी 4 बद्दल महेश मांजरेकरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले, मी....

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी 4 बद्दल महेश मांजरेकरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले, मी....

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी 4 बद्दल महेश मांजरेकरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले, मी....

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये महेश मांजरेकरांचा नवा अवतार पहायाला मिळणार आहे. चौथ्या सीझनबद्दल महत्त्वाची अपडेट मांजरेकरांनी दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  07 सप्टेंबर :  प्रेक्षक अनेक दिवस ज्या शोची आतुरतेनं वाट पाहत आहेत तो शो म्हणजे बिग बॉस मराठी 4. शोचा पहिला प्रोमो रिलीज झाल्यापासूनचं प्रेक्षाकांची उत्सुकता ताणून धरली आहे. अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर चौथा सीझन होस्ट करणार आहेत ते समोर आल्यानंतर तर उत्सुकता आणखी ताणली आहे. दरम्यान महेश मांजरेकर मागच्या दोन आठवड्यांपासून बिग बॉस मराठीचे दमदार टीझर घेऊन येत आहेत. पण बिग बॉस मराठी 4 कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ऑक्टोबर महिन्यात बिग बॉस सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान याबाबत शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. बिग बॉस मराठीचा चौथा पर्व पुढे ढकलण्यात आल्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. मात्र त्याबाबत महेश मांजरेकर आणि वाहिनीनं कोणतीही माहिती दिलेली नव्हती. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची संभाव्या यादी समोर आल्यानंतर आता रिलीज डेट कधी समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. महेश मांजरेकरांनी बिग बॉस सुरू होण्याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. हेही वाचा - Ganeshotsav 2022: ‘जुने दिवस परत आले’ म्हणत बिग बॉस फेम जय दुधाणे अन् दादूसनं घेतलं प्रभादेवीच्या राजाचं दर्शन

जाहिरात

महेश मांजरेकरांनी शेअर केलेल्या प्रोमोमध्ये त्यांचे धमाकेदार 3 लुक समोर आलेत. पहिल्या लुकमध्ये ते सदरा जॅकेट घालून बसलेत तर दुसऱ्या लुकमध्ये तोंडात शिट्टी पकडून लीडरच्या वेशात दिसत आहेत. तिसऱ्या लुकमध्ये मांजरेकर पोस्टमनच्या रुपात दिसत आहेत. ‘मी करणार करणार आहे बिग बॉस मराठीची सगळ्यात मोठी घोषणा… पहात रहा आपलं लाडकं कलर्स मराठी’, असं मांजरेकरांनी म्हटलं आहे.  ‘होणार सगळ्यात मोठी घोषणा’,  या लाईनवरुन नक्कीच बिग बॉस मराठी 4च्या रिलीज डेटची घोषणा मांजरेकर करणार आहेत हे लक्षात येत आहे. मांजरेकरांनी दिलेल्या या हिंटनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. बिग बॉसची रिलीज डेट कधी समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.  बिग बॉस खबरीनं दिलेल्या माहितीनुसार, महेश मांजरेकरांनी चौथ्या सीझनच्या सगळ्या स्पर्धकांबरोबर एक जबरदस्त प्रोमो शूट केला आहे. या आठवड्याच्या शेवटी चौथ्या सीझनची घोषणा होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात