मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mahesh Manjrekar birthday: बिग बॉस मराठीच्या एका एपिसोडसाठी महेश मांजरेकर घेतात एवढे पैसे; नेट वर्थ नेमकं किती?

Mahesh Manjrekar birthday: बिग बॉस मराठीच्या एका एपिसोडसाठी महेश मांजरेकर घेतात एवढे पैसे; नेट वर्थ नेमकं किती?

Mahesh Manjrekar

Mahesh Manjrekar

आपल्या डॅशिंग आणि तुफानी अंदाजात स्पर्धकांची वेळोवेळी शाळा घेणारे मांजरेकर बिग बॉस मराठीच्या सीझनसाठी नेमके किती पैसे आकारतात ठाऊक आहे का?

  मुंबई 15 ऑगस्ट: मराठी इंडस्ट्रीत आपला दरारा कायम ठेवलेले अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर त्यांचा 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत. एक प्रतिष्ठित दिग्दर्शक म्हणून महेश यांनी आपली ओळख बनवली आहे. महेश यांनी बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक म्हणून सध्या एक वेगळी ओळख मिळवली आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त बिग बॉस मराठीच्या एका एपिसोडसाठी नेमके किती पैसे घेतात हे जाणून घेऊया. बिग बॉस मराठी हा (mahesh manjrekar bigg boss marathi) कार्यक्रम ज्यांच्याशिवाय अपूर्ण आहेत असे महेश मांजरेकर त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि कार्यक्रमात त्यांच्या डॅशिंग अंदाजासाठी ओळखले जातात. त्यांच्या स्पेशल स्टाईलमध्ये होणार वीकेंडचा डाव नसेल तर कार्यक्रमात मजा नाही. दर आठवड्याच्या शेवटी येऊन स्पर्धकांची शाळा घेणारे मांजरेकर बिग बॉसच्या एका आठवड्यासाठी तब्बल 25 लाख रुपये आकारतात अशी माहिती समोर आली आहे. तर त्यांचं एकूण मानधन हे कोटींच्या घरात असल्याचं सांगण्यात येतं. अर्थात हे आकडे आधीच्या सीझनचे असून या सिझनला त्यांच्या मानधनात वाढ झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात या मानधनाबद्दल कोणीतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे याची पुष्टी न्यूज18 लोकमत देत नाही. हे ही वाचा- Utkarsh Shinde: 'आज तुला पाहिलं आणि...' स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी उत्कर्षला भेटली स्पेशल व्यक्ती बिग बॉस मराठीसारखा चर्चित कार्यक्रम वगळता सुद्धा महेश यांनी दिग्दर्शक म्हणून अफाट लोकप्रियता मिळवली आहे. महेश यांचं नेट वर्थ हे जवळपास चाळीस कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. महेश प्रत्येक सिनेमासाठी 30-50 लाख रुपये आकारतात असं सुद्धा सांगितलं जातं. याबद्दलची पुष्टी न्यूज18 लोकमत करत नाही.
  सध्या महेश मांजरेकर यांचा दे धक्का 2 सिनेमा रिलीज झाला असून येत्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील जीवनपट ते घेऊन येणार आहेत. वास्तव सिनेमातून सुरु झालेला महेश यांचा प्रवास आजही अविरत सुरु आहे. हे ही वाचा- वर्गात विद्यार्थी नवे पण मास्तर तेच! Bigg Boss Marathi 4 साठी महेश मांजरेकरच करणार सूत्रसंचालन; प्रोमो आऊट वास्तव, नटसम्राट, काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दे धक्का अशा सुपरहिट सिनेमांसाठी त्यांना ओळखलं जातं. येत्या काळात महेश बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचे होस्ट म्हणून दिसणार आहेत. त्यांनी णुकीतच कर्करोगावर यशस्वीपणे मात केली आहे आणि पुन्हा जोमाने काम करायला सुरुवात केली आहे. (सदर माहितीची न्यूज18 लोकमत पुष्टी देत नाही.)
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment

  पुढील बातम्या