जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ganeshotsav 2022: 'जुने दिवस परत आले' म्हणत बिग बॉस फेम जय दुधाणे अन् दादूसनं घेतलं प्रभादेवीच्या राजाचं दर्शन

Ganeshotsav 2022: 'जुने दिवस परत आले' म्हणत बिग बॉस फेम जय दुधाणे अन् दादूसनं घेतलं प्रभादेवीच्या राजाचं दर्शन

Ganeshotsav 2022: 'जुने दिवस परत आले' म्हणत बिग बॉस फेम जय दुधाणे अन् दादूसनं घेतलं प्रभादेवीच्या राजाचं दर्शन

बिग बॉस मराठी 4 ची सर्वांची उत्सुकता लागलेली असताना बिग बॉस 3चे स्पर्धक जय आणि दादूस यांनी मुंबईच्या गणपती मंडळणांना भेट दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 07 सप्टेंबर :  बिग बॉस मराठी 3 च्या धम्माल सीझननंतर बिग बॉस मराठी 4 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नव्या पर्वाची सगळेच वाट पाहत आहेत. ऑक्टोबर महिन्यात बिग बॉसमराठी 4 सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात धम्माल करणारे जय दुधाणे आणि दादूस यांनी मुंबईच्या गणपतीचं एकत्र दर्शन घेतलं आहे. जय आणि दादूस एकत्र मुंबईच्या प्रभादेवीच्या राजाच्या दर्शनाला आले होते. बिग बॉस मराठी 4 च्या निमित्तानं त्यांनी नव्या सीझनचं प्रमोशन करत प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली दादूस आणि जय यांनी प्रभादेवीच्या राजाची मनोभावे आरती केली. आरती नंतर मीडियाशी संवाद साधनताना दोघांनी मनातील भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना दादूस म्हणाले, ‘बाप्पा आता बास झालं. मागचे 2-3 वर्ष आम्ही ज्या अवस्थेत काढली तसे दिवस परत आणू नकोस. तुझ्या आगमनानं आम्ही सगळे खूश आहोत आणि आम्हाला असंच राहू देत’. हेही वाचा - Bigg Boss Marathi 4: ‘या’ दिवशी सुरू होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन; कोण असणार स्पर्धक?

जाहिरात

तर बिग बॉस फेम जय दुधाणे म्हणाला, ‘विघ्नहर्ता म्हणजे विघ्न दूर करणारा आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं बाप्पानं विघ्न दूर केलं आहे. सगळं रिस्टार्ट केलं आहे ज्या पद्धतीनं दहीहंडी साजरी केली त्याच उत्साहानं गणपती साजरे करत आहोत. जुने दिवस परत आल्यासारखं वाटत आहे.  बाप्पाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी होणारी गर्दी पाहून खूप आनंद होत आहे’.

जय आणि दादूस यांनी ब्लॅक जीपमधून वाजत गाजत प्रभादेवीच्या राजाच्या मंडपात एंट्री घेतली. त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. जीपवर बिग बॉस मराठी 4 चे पोस्टर्सही लावण्यात आले होते. दादूस आणि जयच्या एंट्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन दिग्दर्शक महेश मांजरेकरच होस्ट करणार आहेत. सीझनची डेट या आठवड्यात कळणार आहे. महेश मांजरेकर चौथ्या सीझनच्या सगळ्या स्पर्धकांबरोबर प्रोमोचं शुटींग करत असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात