मुंबई, 28 मार्च: अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut Lock Upp Show) ALT बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील शो लॉक अप (Lock Upp Latest Update) दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे. या ‘अत्याचारी जेल’मध्ये रोज काही ना काहीतरी प्रकार घडताना दिसत आहे. नवनवीन टास्क दिले जात आहेत, कुणाला बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे तर कुणाला वाइल्ड कार्ड एंट्री मिळत आहे. कंगना रणौतचा हा शो सुरू होऊन अवघा महिना झाला असला तरीही आत्तापर्यंत यात अनेक वाइल्ड कार्ड (Lock Upp Wild Card Entry) एंट्री झाल्या आहेत. अली मर्चंट, चेतन हंसराज, मंदाना करीमी, अजमा फल्लाह यांच्या वाइल्ड कार्ड एंट्री झाल्या असून अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. अलीकडच्या एपिसोडमध्येच सायशा शिंदेला लॉकअपबाहेर जावं लागलं. दरम्यान आता शोमध्ये दोन तरुणांची एंट्री झाली आहे. त्यापैकी एक बिग बॉस ओटीटीचा माजी स्पर्धक आहे. कंगना रणौतच्या शोमध्ये टीव्ही कलाकार विनीत कक्कर आणि झीशान खान (Vinit Kakkar And Zeeshan Khan wild card entry in Lock Upp) यांची एन्ट्री झाली आहे. झीशान हा बिग बॉस ओटीटीचा स्पर्धक राहिला आहे. हे वाचा- ‘पाकिस्तानी म्हणतात भारतात जा.. भारतीय म्हणतात पाकिस्तानात जा’; 83 च्या दिग्दर्शकाची व्यथा अलीकडेच, शोच्या अपकमिंग एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये झीशान खान आणि विनीत कक्करची धमाकेदार एंट्री पाहायला मिळाली. आता हे दोन्ही स्टार्स शोमध्ये एकत्र धमाका करतात का, तसंच त्यांची एंट्री प्रेक्षकांना किती आवडते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मंदाना करीमी आणि अजमा फल्लाह यांची वाइल्ड कार्ड एंट्री गेल्याच आठवड्यात झाली आहे आणि शोमध्ये प्रवेश करताच या दोन्ही ‘हसीनां’नी त्यांचा जम बसवण्यास सुरुवात केली आहे. या दोघींच्या एंट्रीनंतर पाण्यावरुन झालेलं जोरदार भांडण प्रेक्षकांना पाहायला मिळालं. आता झीशान आणि विनीतच्या एंट्रीनंतर नेमकं काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यात झालेलं सायशा शिंदेचं एलिमिनेशन प्रेक्षकांसाठी धक्कादायक होतं. कंगनाने सायशाला बाहेरचा रस्ता दाखवण्याचं कारण होतं सायशाने थेट कंगनाशी घातलेला वाद. सायशावर होत असलेल्या टिप्पणीवरुन तिने कंगनाशीच वाद घातला, त्यामुळे कंगनाने तिला बाहेरचा रस्ता दाखवला.