मुंबई, 27 मार्च- देशभक्ती आणि राष्ट्रवाद यावरून देशातील वातावरण ढवळून निघत आहे. अशातच प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खान (kabir khan) यांनी एका मुलाखतीतून व्यथा मांडली आहे. काही लोक सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल करतात आणि पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देत असतात. हे पाहून वाईट वाटते. पण, सोशल मीडियाने ट्रोलर्सना काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, अशा शब्दांत कबीर खानने आपली नाराजी व्यक्त केली. सध्याच्या काळात सोशल मीडियावर लोक कसेही व्यक्त होतात. दहा वर्षांपूर्वी लोक असे वागत नव्हते. शब्दांचा वापर जबाबदारीने केला जात होता. आज लोकांना जबाबदारीचे भान राहिले नाही. याचे वाईट वाटते पण हेच सत्य आहे, असे कबीर खान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. तसेच सोशल मीडियावर सकारात्मकतेपेक्षा नकारत्मकता भरली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. वाचा- ‘IPL’मध्ये झळकला ‘KKR’ चा मिस्ट्री बॉय, त्याच्या Smile ने केली सर्वांवर जादू माझे नाव खान आहे आणि यासाठीच मला पाकिस्तानात जा असे म्हटले जाते. मी एकदा पाकिस्तानात गेलो होते. तर तिकडे लष्कर ए तैय्यबा ने मला भारतात परत जाण्यास सांगितले. त्यामुळे मी इकडचाही नाही आणि तिकडचाही नाही. पण प्रत्येक चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्याचे आपले स्वत:चे वेगळे अस्तित्व असले पाहिजे. आम्ही कधी कधी चित्रपटात तिरंगाही दाखवतो. परंतु, आता देशभक्ती आणि राष्ट्रवाद यामध्ये मोठे अंतर पडल्याची भावना खान यांनी व्यक्त केली. वाचा- PHOTO: हृता दुर्गुळे याठिकाणी घेतेय सुट्टीचा आनंद, समोर आले सुंदर फोटो आपला चित्रपट 83 चे उदाहरण देऊन खान म्हणाले की, राष्ट्रवादासाठी एक काउंटरपॉइंट व्हिलनची गरज असते. मात्र, देशभक्तीसाठी आम्हाला अशा कोणत्याही बाबीची गरज नसते. दरम्यान चित्रपटात कपिल देव यांची भूमिका अभिनेता रणवीर सिंहने साकारली होती. तर त्यांची पत्नी रोमी भाटियाच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसली होती. याशिवाय चित्रपटात साकिब सलीम, हार्डी संधू, ताहीर राज भसीन, एमी विर्क, जतिन सरना आणि इतर अभिनेतेही दिग्गज क्रिकेटपटूंच्या भूमिकेत दिसले होते. त्यांनी १९८३ मध्ये वेस्ट इंडिजला पराभूत करून विश्वचषक जिंकला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.