जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ...म्हणून भावाच्या दुसऱ्या लग्नाला अल्लू अर्जुन गेला नाही

...म्हणून भावाच्या दुसऱ्या लग्नाला अल्लू अर्जुन गेला नाही

...म्हणून भावाच्या दुसऱ्या लग्नाला अल्लू अर्जुन गेला नाही

Allu Ajun माझं २०१५ मध्ये लग्न झालं होतं. पण काही कारणांमुळे २०१६ मध्ये आनंदाने घटस्फोटही झाला. पण यावेळी देवाने मला पुढे जाण्याची संधी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

हैदराबाद, 23 जून- दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील स्टायलिश स्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा मोठा भाऊ अल्लु वेंकटेश उर्फ बॉबीने नुकतंच दुसरं लग्न केलं. स्वतः बॉबीने त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले. याशिवाय लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉबीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं की, ‘मित्रांनो माझं लग्न झालं. ही माझ्यासाठी एक नवीन सुरुवात आहे आणि तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. माझं २०१५ मध्ये लग्न झालं होतं. पण काही कारणांमुळे २०१६ मध्ये आनंदाने घटस्फोटही झाला. पण यावेळी देवाने मला पुढे जाण्याची संधी दिली आहे. माझं कुटूंब माझ्यासोबत आहे.’

जाहिरात
जाहिरात

शुक्रवारी हैदराबादमध्ये बॉबीने पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. या आनंदाच्या दिवशी बॉबीचे मित्र परिवार उपस्थित होता. बॉबी हा सिनेनिर्माता आहे. बॉबीची पत्नी नीला शाहने एमबीए केलं असून ती योग शिक्षिका आहे. नीला आपल्या बहिणीसोबत योग स्टुडिओ चालवते आणि हैदराबादमध्येच राहते. ४५ वर्षीय बॉबीचं हे दुसरं लग्न आहे आणि त्याला १० वर्षांची मुलगीही आहे. अल्लू बॉबीचं मूळ नाव अल्लू व्यंकटेश आहे. पण प्रेमाने त्याला बॉबी म्हणतात. मीडिया रिपोर्टनुसार, बॉबीच्या लग्नात अल्लू अर्जुन उपस्थित नव्हता. अर्जुन सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. लवकरच तो AA19 सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाहिरात
जाहिरात

शाहिद कपूरचा ‘Kabir Singh’ इंटरनेटवर लीक, सिनेमाला बसणार पायरसीचा फटका SPECIAL REPROT : सफाई कामगार ते बिग बॉस, बिचुकलेला उदयनराजेंही घाबरतात! VIDEO : वाऱ्याच्या वेगानं धावला सलमान खान, घोड्यालाही टाकलं मागे VIDEO : बिचुकलेचं पितळ उघडं, आणखी एका गुन्ह्यात अडकला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात