जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kriti Sanon-Prabhas: क्रितीने अखेर प्रभाससोबतच्या नात्याबद्दल तोडलं मौन; म्हणाली 'माझ्या लग्नाची तारीख जाहीर...'

Kriti Sanon-Prabhas: क्रितीने अखेर प्रभाससोबतच्या नात्याबद्दल तोडलं मौन; म्हणाली 'माझ्या लग्नाची तारीख जाहीर...'

क्रिती सेनन-प्रभास

क्रिती सेनन-प्रभास

सध्या बॉलिवूडमध्ये क्रिती सेनन आणि बाहुबली स्टार प्रभासच्या अफेयर्सच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता क्रितीने अखेर प्रभास आणि तिच्या नात्याविषयी समोर येत सत्य सांगितलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 नोव्हेंबर :   बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळे सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. अलीकडे क्रिती सेनन आणि तिचा ‘आदिपुरुष’ सह-कलाकार प्रभासचं नाव जोरदार ट्रेंड होत आहे. याचं कारणदेखील तितकंच खास आहे. सध्या बॉलिवूडमध्ये क्रिती सेनन आणि बाहुबली स्टार प्रभासच्या अफेयर्सच्या चर्चांना उधाण आलं आहे.  क्रिती आणि प्रभास लवकरच ‘ आदिपुरुष ’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या सेटवरच क्रिती आणि प्रभासमध्ये जवळीकता निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नाही तर प्रभासने आदिपुरुषच्या सेटवर गुडघ्यावर बसून प्रपोज केले आणि क्रितीने त्याला लग्नासाठी ‘हो’ म्हटले, असा दावाही करण्यात आला होता. आता क्रितीने या सगळ्या बातम्यांवर अखेर मौन सोडलं आहे. क्रिती  आणि प्रभासच्या  नात्याविषयी तिचा जवळचा मित्र आणि अभिनेता वरुण धवन याने मोठी हिंट दिली होती. क्रिती सॅनन सध्या तिच्या ‘भेडिया’ या हिंदी चित्रपटाचे प्रमोशन करत असून मुलाखतीदरम्यान तिने प्रभासचा उल्लेख केल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. वरुण धवनने करण जोहरच्या डान्स रिअॅलिटी शो झलक दिखला जा 10 चेष्टेत सांगून टाकलं होतं कि क्रिती प्रभासला डेट करत आहे. यानंतर क्रिती आणि प्रभासच्या नात्याच्या अनेक बातम्या समोर येऊ लागल्या. आता क्रितीने अखेर प्रभास आणि तिच्या नात्याविषयी समोर येत सत्य सांगितलं आहे. हेही वाचा - विकी-कियारा बाथटबमध्ये झाले रोमॅन्टिक; VIDEO पाहून चाहत्यांना आली कतरिनाची आठवण क्रितीने अखेर काही तासांपूर्वी क्रिती सेननने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अधिकृत स्टेटमेंट जारी करून तिच्या आणि प्रभासच्या रिलेशनशिपच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. क्रिती सॅननने तिच्या नोटमध्ये लिहिले आहे की, “हे प्रेम नाही किंवा प्रमोशन देखील नाही. आमचा ‘भेडिया’ म्हणजे वरुण धवन रिअॅलिटी शोमध्ये जरा जास्तच वाइल्ड झाला आणि लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला. त्यामुळे नाही त्या अफवा पसरल्या. पण काही माध्यमांनी माझ्या लग्नाची तारीख जाहीर करण्याआधीच मी या अफवांना पूर्णविराम देते. ही अफवा कशाचाही आधार नसलेली पूर्णतः बेसलेस आहे. त्यामुळे कृपया यावर विश्वास ठेवू नका”, असे क्रितीने म्हटले.

News18

दरम्यान, क्रिती आणि प्रभासच्या नात्याविषयी बोललं जात होतं  कि, आदिपुरुषच्या सेटवर या दोघांमध्ये पहिल्याच दिवसापासून फार छान बॉंडिंग झालं आहे. प्रभास फारच लाजरा आहे तो आपल्या सह-अभिनेत्रींशी फारसं बोलत नाही.परंतु अभिनेता क्रिती सेननच्या फारच जवळ आल्याचं म्हटलं जात आहे. हे दोघे सेटवर बराच वेळ सोबत घालवत होते असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. शिवाय शूटिंग संपल्यानंतरही हे दोघे संपर्कात आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना आपल्या नात्याबाबत आत्ताच कोणतीही वाच्यता करायची नाहीय.

News18लोकमत
News18लोकमत

प्रभासचे नाव  याआधी बाहुबली स्टार अनुष्का शेट्टीसोबत जोडले गेले होते. मात्र, दोघेही नेहमी ‘फक्त मित्र’ असल्याचे सांगत आहेत. अनुष्का शेट्टी व्यतिरिक्त, प्रभासचं  नाव  यापूर्वी कधीही कोणत्याही अभिनेत्रीशी जोडले गेलेले नाही, त्यामुळे या अफवांनी नक्कीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र आता क्रितीने  खुलासा करत हे दोघे एकत्र असल्याच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात