मुंबई, 26 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळे सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. अलीकडे क्रिती सेनन आणि तिचा ‘आदिपुरुष’ सह-कलाकार प्रभासचं नाव जोरदार ट्रेंड होत आहे. याचं कारणदेखील तितकंच खास आहे. सध्या बॉलिवूडमध्ये क्रिती सेनन आणि बाहुबली स्टार प्रभासच्या अफेयर्सच्या चर्चांना उधाण आलं आहे. क्रिती आणि प्रभास लवकरच ‘आदिपुरुष’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या सेटवरच क्रिती आणि प्रभासमध्ये जवळीकता निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. आता यांच्या नात्याविषयी क्रितीचा जवळचा मित्र आणि अभिनेता वरुण धवन याने मोठी हिंट दिली आहे. तसंच क्रितीचा एक व्हिडीओ सहल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे सध्या या दोघांचं नातं सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. क्रिती सॅनन सध्या तिच्या ‘भेडिया’ या हिंदी चित्रपटाचे प्रमोशन करत असून मुलाखतीदरम्यान तिने प्रभासचा उल्लेख केल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. व्हायरल होत असलेल्या एका क्लिपमध्ये, क्रिती सेनन म्हणतेय की, ‘मला कधी संधी मिळाली तर मी प्रभासशी लग्न करेल.’ त्याचबरोबर दुसर्या व्हिडिओमध्ये, वरुण धवन अप्रत्यक्षपणे क्रितीच्या आयुष्यात तिचा ‘शेहजादा’ आला आहे’ असं म्हणतोय. हेही वाचा - Alia Ranbir Daughter : आलिया रणबीर अशी घेतायेत लेकीची काळजी; कोणाचीही मदत घेण्यास नकार ‘भेडिया’ च्या प्रमोशनदरम्यान या व्हिडिओमध्ये वरुणला ‘क्रितीला कोणासोबत पाहायला आवडेल?’ असं विचारलं तेव्हा तो म्हणाला कि, ‘‘क्रितीच्या आयुष्यात तिचा ‘शेहजादा’ आला आहे’ असं म्हणत त्याने आधी कार्तिक आर्यनचं नाव घेतलं पण नंतर हळूच प्रभास सोबत तिची जोडी चांगली दिसेल’ असं म्हणाला. आता या व्हिडिओनंतर चाहते या दोघांच्या नात्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आतुर झाले आहेत. हे व्हिडीओ पाहून क्रिती आणि प्रभासच्या डेटिंगच्या अफवा खऱ्या असाव्या अशी आशा करत आहेत.
#Prabhas || @kritisanon || #PraKriti 💕
— DHK ™ (@Devineni_Hari) August 20, 2021
Watch Full Video - https://t.co/OnOcAW9JmI
Using For Fair Use Only Malli Rights Veyyakandi pic.twitter.com/clWs8VP92F
दरम्यान, क्रिती आणि प्रभासच्या नात्याविषयी बोललं जात होतं कि, आदिपुरुषच्या सेटवर या दोघांमध्ये पहिल्याच दिवसापासून फार छान बॉंडिंग झालं आहे. प्रभास फारच लाजरा आहे तो आपल्या सह-अभिनेत्रींशी फारसं बोलत नाही.परंतु अभिनेता क्रिती सेननच्या फारच जवळ आल्याचं म्हटलं जात आहे. हे दोघे सेटवर बराच वेळ सोबत घालवत होते असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. शिवाय शूटिंग संपल्यानंतरही हे दोघे संपर्कात आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना आपल्या नात्याबाबत आत्ताच कोणतीही वाच्यता करायची नाहीय.
प्रभासचे नाव याआधी बाहुबली स्टार अनुष्का शेट्टीसोबत जोडले गेले होते. मात्र, दोघेही नेहमी ‘फक्त मित्र’ असल्याचे सांगत आहेत. अनुष्का शेट्टी व्यतिरिक्त, प्रभासचं नाव यापूर्वी कधीही कोणत्याही अभिनेत्रीशी जोडले गेलेले नाही, त्यामुळे या अफवांनी नक्कीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता हे दोघे खरंच रिलेशनशिप मध्ये आहेत का हे येणार काळच सांगेल.