मुंबई, 16 नोव्हेंबर: दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘ आदिपुरुष ’ हा चित्रपट गेल्या दीड महिन्यांपासून चर्चेत आहे. त्याचा टीझर रिलीज झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अनेकांनी चित्रपटाच्या व्हीएफएक्सकडे बोट दाखवले, यात राम आणि रावणाच्या व्यक्तिरेखांविषयी अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.काहींनी तर चित्रपटावर बहिष्काराची मागणी केली होती. सर्वत्र होणारा विरोध बघता दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी माघार घेत या चित्रपटाचे प्रदर्शन सहा महिन्यांनी पुढे ढकलले आहे. आता या दरम्यान चित्रपटात काही मोठे बदल करण्यात येणार आहेत. सैफ अली खान आदिपुरुषमध्ये रावणाची भूमिका साकारत आहे. जेव्हा टीझर रिलीज झाला तेव्हा त्याच्या लूकबद्दल वाद निर्माण झाला होता. त्याच्या दाढी आणि मिशीवर लोकांनी आक्षेप घेतला. सोशल मीडियावर प्रचंड विरोध झाला. आता यावरही निर्मात्यांनी इलाज शोधल्याची बातमी येत आहे. आता VFX च्या माध्यमातून चित्रपटातील रावणाची दाढी आणि मिशा काढली जाणार आहे. ‘इटाईम्स’च्या रिपोर्टनुसार, सैफ अली खानच्या लूकवर अजून काम करण्याची गरज आहे. आता अभिनेत्याचा लूक डिजिटल पद्धतीने बदलला जाणार आहे. त्याची दाढी काढली जाईल. यावर आता अनेक लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. हेही वाचा - Bigg Bossमधील भांडणाचा रोहित रुचिराच्या नात्यावर परिणाम? पाहा काय म्हणाली अभिनेत्री रिपोर्टनुसार, टीझरनंतर ज्या प्रकारचा वाद झाला आहे, त्यानुसार सिनेमात बदल करण्यासाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक ओम राऊत यांनी सोशल मीडियावर चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली होती. पोस्टर शेअर करताना लिहिले होते- आदिपुरुष हा केवळ चित्रपट नाही. उलट, हे प्रभू श्री राम यांच्याप्रती असलेल्या भक्तीचे आणि आपल्या गौरवशाली इतिहास आणि संस्कृतीशी असलेल्या आपल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. आदिपुरुषच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या लोकांना प्रेक्षकांना एक अप्रतिम अनुभव देण्यासाठी थोडा अधिक वेळ द्यावा लागेल. आदिपुरुष आता 16 जून 2023 रोजी रिलीज होणार आहे. ’’ ऑक्टोबरमध्ये जेव्हा टीझर रिलीज झाला होता, तेव्हा तो येताच त्यावर गदारोळ झाला होता. त्यावर अनेक टीका झाल्या. सर्व काही बदलेल असे वाटत होते पण त्यावेळी ओम राऊत यांनी चित्रपट बदलणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते पण जेव्हा चित्रपटाविरोधात कायदेशीर नोटिसा येऊ लागल्या आणि याचिका दाखल होऊ लागल्या तेव्हा त्यांनी आपला विचार बदलला आणि आपण याकडे लक्ष देत असल्याचे सांगितले. आणि त्यानुसार आता चित्रपटात बदल केला जाईल.
‘न्यूज18’शी खास बातचीत करताना दिग्दर्शक ओम राऊत म्हणाले होते कि, ‘आमच्यावर विश्वास ठेवा. आमच्यासाठी, आमचे प्रेक्षक सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत. म्हणूनच जे आम्हाला सूचना देत आहेत त्यांची आम्ही दखल घेत आहोत. आम्ही सर्व सूचना लिहून घेत आहोत आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की 12 जानेवारी 2023 रोजी जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हाचित्रपट पाहून कोणीही निराश होणार नाही. आमच्यावर विश्वास ठेवा.’