मुंबई 4 जुलै: अभिनेता किरण माने (
Kiran Mane) आपल्या बेधडकपणासाठी प्रसिद्ध आहे. जिथे अनेक कलाकार आपलं राजकीय मत मांडायला कचरत असतात तिथे हा अभिनेता सडेतोड पद्धतीने आपलं मत मांडताना दिसतो. स्वतःला कोणत्याही पक्षाचा न म्हणवणारा, कोणाचीच बाजू न घेता प्रत्येक बाजूंवर मत मांडणारा किरण माने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी सुद्धा कारण आहे त्याने केलेलं एक वक्तव्य.
किरण एका मोठ्या कॉंट्रोव्हर्सीचा (
Kiran Mane controversy) भाग होऊन गेला. पण त्यातूनही न डगमगता तो फेसबुकवर आपली मतं बेधडकपणे मांडताना दिसतो. त्याच्या पोस्ट ह्या अनेकदा राजकारण, पक्ष, समाज, कार्यकर्ते या धाटणीच्या असतात. त्याने एका पोस्टमध्ये आपल्या पॉलिटिकल सिनेमाचं काम चालू आहे असा उल्लेख सुद्धा केला होता. त्यामुळे त्याचा राजकारणावर बारीक अभ्यास किंवा लक्ष असतं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही.
सध्या त्याने शिवसेना नेते संजय राऊत (
Kiran Mane on Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधत एक
मत मांडलं आहे. साधारणपणे सव्वापाच वाट्या किरीट सोमैय्या, साडेतीन टेबलस्पून चंद्रकांतदादा, अर्धा चमचा उपाध्ये किंवा वाघताई - दोघांपैकी जे हाताशी असेल ते.. वरून चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे.. याचं मिश्रण एकजीव करून खरपूस तळलं की एक चविष्ट 'संजय राऊत' तयार होतात !’ असं वक्तव्य एका फेसबुक पोस्टमार्फत किरण माने करताना दिसत आहे.

किरण माने याआधी सुद्धा आपल्या लेखनामुळे आणि वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अनेकदा त्याचं हे बोलणं त्याच्यासाठी चिंतेचा विषय ठरतं आणि त्याला ट्रोलिंगला सुद्धा सामोरं जावं लागतं.
हे ही वाचा- विठ्ठल भक्तीत तल्लीन झाला अभिनेता, विशाल निकमचा वारी स्पेशल VIDEO नक्की पाहा
सध्याच्या राजकीय परिस्थीवर असो अनेक सामाजिक मुद्द्यांवर किरण माने स्प्ष्टपणे मत व्यक्त करताना दिसतो. मागे उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर त्याने एक खास पोस्ट शेअर करून काही आठवणी शेअर केल्या होत्या. अनेक कॉंट्रोव्हर्सीचा भाग झालेला एक प्रसिद्ध अभिनेता किरण माने याने आज शिवसेना नेते राऊत यांच्याबद्दल केलेलं हे वक्त्यव्य काय पडसाद उमटवतं हे आता पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.