जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / विठ्ठल भक्तीत तल्लीन झाला अभिनेता, विशाल निकमचा वारी स्पेशल VIDEO नक्की पाहा

विठ्ठल भक्तीत तल्लीन झाला अभिनेता, विशाल निकमचा वारी स्पेशल VIDEO नक्की पाहा

विठ्ठल भक्तीत तल्लीन झाला अभिनेता, विशाल निकमचा वारी स्पेशल VIDEO नक्की पाहा

विशाल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. अनेक फोटो व्हिडीओ तो शेअर करत असतो. नुकतंच विशालचं वारी स्पेशल गाणं प्रदर्शित झालं असून त्यानं गाणं पाहण्यासाठी आवाहन केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 जुलै:  बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या ( Big Boss Marathi 3) पर्वातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता विशाल निकम ( Vishal Nikam) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशाल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. अनेक फोटो व्हिडीओ तो शेअर करत असतो. विशाल पांडूरंगाचा भक्त आहे हे आपण बिग बॉसमध्ये पाहिलंच. विशालच्या तोंडून माऊली हा शब्दही आपण बऱ्याचदा ऐकला आहे. या आषाढी एकादशी निमित्त विशाल विठ्ठलभक्तीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशाल निकमवर चित्रीत करण्यात आलेलं ‘पंढरीच्या पांडुरंगा’ ( Pandharichya Panduranga Song)  हे सुंदर  म्युझिकल गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. विशालला माऊलींच्या व्हिडीओमध्ये पाहून त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय. यंदाची वारी महाराष्ट्रासाठी खास आहे. कारण कोरोना महामारीनंतर पहिल्यांदा वारी साजरी होणार आहे. दोन वर्ष वारीसाठी आतुर झालेल्या वारकऱ्यांच्या मनाची स्थिती, त्यांच्या भावना  ‘पंढरीच्या पांडुरंगा’ या गाण्यातून दाखण्यात आल्या आहेत. पांडुरंगावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या भावनांना हात घालणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. अभिनेता विशाल निकमनं देखील सुंदर अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेल्या विशालला पाहून प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले आहेत. हेही वाचा - Sai Tujha Lekaru: दगडूच्या स्वॅगचा पुन्हा एकदा कल्ला, Timepass3 चं पहिलं गाणं रिलीज

जाहिरात

‘पंढरीच्या पांडुरंगा सावळ्या विठ्ठला, तुझ्यामध्ये जीव माझा रंगला, दंगला’, अशा सुंदर शब्दांची गुंफण असलेल्या या गाण्याचं शब्द ऐकणारा प्रत्येक जण गाणं संपल्यानंतरही गुणगुणत राहतो. गाण्यात पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्या, ज्ञानोबा तुकोबांच्या घोषणा, पारंपारिक गीतं दाखवण्यात आली आहेत. मनाला शांतता आणि आनंद देऊन जाणारं हे गाणं सर्वांना पाहाव यासाठी अभिनेता विशाल निकमनं सर्वांना आवाहन केलं आहे.  ‘पंढरीच्या पांडुरंगा " ह्या गाण्याला जे काही तुम्ही प्रेम आणि प्रतिसाद दिला आहे त्या साठी मनापासून धन्यवाद! तुम्ही जर आता पंढरपूरला वारीला किंवा जवळपासच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेलात तर नक्की हे गाणं तुमच्या स्टोरीला वापरा सुंदर रील बनवून पोस्ट करा आणि मला टॅग किंवा mention करा! अजून ही जर गाणं पाहिलं नसेल तर नक्की पहा’, असं विशालनं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात