मुंबई, 21 सप्टेंबर : दिग्दर्शक केदार शिंदे यांची मराठी नाटकं असो किंवा सिनेमा. त्यांचा प्रत्येक सिनेमा गाजला आणि प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. त्यांचा असाच एक सिनेमा म्हणजे अगं बाई अरेच्चा. स्त्रीच्या मनातील ऐकू येणाऱ्या त्या पुरुषाची कहाणी प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली. अभिनेता संजय नार्वेकरच्या उत्कृष्ट अभिनयानं या सिनेमाला चार चांद लावले खरे पण सिनेमातील आणखी अनेक पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहेत. 'काका मीच म्हणाले तुम्हाला वेडा...', असं म्हणणारी चिमुरडी तुम्हाला आठवतेय का? तिच चिमुरडी तब्बल 19 वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
'मी तर मनातल्या मनात तुम्हाला वेडा म्हणाले पण तुम्हाला कसं कळलं', असं म्हणून चिडवणारी ती छोटी चिमुरडी दुसरी तिसरी कोणी नसून दिग्दर्शक केदार शिंदे यांची लेक आहे. सना शिंदेनं 2004मध्ये अगं माई अरेच्चा या सिनेमात छोट्या मुलीचा छोटासा रोल केला होता. ती चिमुरडी आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. सना आता मोठी झाली असून पणजोबांच्या सिनेमात पणजीची भूमिका साकारणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा 2023मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात सना शाहीर साबळेंच्या पत्नीची म्हणजेच भानूमती यांची भूमिका साकारणार आहे. सनाचा भानुमतीचा पहिला लुक देखील समोर आला आहे.
हेही वाचा - Maharashtra shaheer: शाहीरांचा रोचक जीवन प्रवास उलगडणार; 'महाराष्ट्र शाहीर'ची रिलीज डेट जाहीर
महाराष्ट्र शाहीरच्या निमित्तानं केदार शिंदेनी जुन्या आठवणींना उजाळा देत लेकीची नवी ओळख करून दिली आहे. अगं बाई अरेच्चा मधील सनाचा तो सीन आणि महाराष्ट्र शाहीरसाठी तिनं केलेली तयारी याचा छोटासा व्हिडीओ त्यांनी शेअर केलाय.
View this post on Instagram
केदार शिंदे यांनी म्हटलं, 'काका मीच म्हणाले तुम्हाला वेडा..” हे वाक्य बोलणाऱ्या छोट्याशा मुलीला तुम्ही २००४ पासून ओळखतच असाल.. पण २०२३ मध्ये येणाऱ्या महाराष्ट्र शाहीर मध्ये भानूमती म्हणून पदार्पण करणारी हीच छोटीशी मुलगी आहे हे तुम्ही ओळखलत का?? सना शिंदे.. माझी लेक.. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा ह्या प्रवासात तिच्या सोबत असू द्या'.
बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात करणाऱ्या सनाचं मोठ्या पडद्यावरचं हे मोठं पदार्पण आहे. वडिलांच्या गुणांचा आणि शाहीरांचा वारसा जपत सना मोठ्या पडद्यावर पणजीची भूमिका साकारत आहे. तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सिनेसृष्टीसह प्रेक्षकही उत्साही आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment