Home /News /entertainment /

'महाराष्ट्र शाहीर'साठी लोकेशन हंटिंग पूर्ण; सिनेमात दिसणार साताऱ्याचा नयनरम्य नजारा

'महाराष्ट्र शाहीर'साठी लोकेशन हंटिंग पूर्ण; सिनेमात दिसणार साताऱ्याचा नयनरम्य नजारा

महाराष्ट्राचे थोर लोककलावंत शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या टीमनं नुकतंच लोकेशन हंटिंग पूर्ण केलं, तिथला अनुभव केदार शिंदे यांनी सर्वांबरोबर शेअर केला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 2 जुलै : प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा 'महाराष्ट्र शाहीर' ( Maharashtra Shahir) या सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहिरांच्या मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी झळकणार आहे. केदार शिंदेच्या आयुष्यातील हा त्यांचा सर्वांत महत्त्वाचा सिनेमा ठरणार आहे. सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करण्यापूर्वी केदार शिंदे आणि टीमनं सुंदर लोकेशनच्या शोधात आहेत. नुकताच त्यांची साताऱ्यातील काही ठिकाणांना भेटी दिल्यात आणि साताऱ्याच्या डोंगरांगामधील काही उत्तम लोकेशन्स फायनल केले आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर लोकेशन हंटिंगचा एका व्हिडीओ शेअर करत. टिमने घेतलेल्या मेहनतीचं कौतुक केलं आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमासाठी शोधलेलं लोकेशन आणि त्याच्यासाठी केलेली मेहनत याचा व्हिडिओ केदार शिंदे यांनी  शेअर केला आहे. व्हिडीओसह लिहिलेल्या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यांनी म्हटलंय,  कुठल्याही सिनेमात पडद्यावर कलाकार जितका महत्वाचा रोल प्ले करतो तितकाच महत्वाचा भाग शुटिंगसाठी निवडण्यात येणाऱ्या लोकेशनचा असतो. लोकेशन सुद्धा सिनेमाचं एक पात्रच असतं आणि त्यात ही महाराष्ट्र शाहीर सारखा पिरियड सिनेमा असेल तर लोकेशन निवडीचे निकष अधिकच कठीण होतात.. त्या काळातली स्थापत्य रचना.. रंगसंगती.. रस्त्यांची रचना.. घरांच्या बांधकामाची पद्धत.. अशा अनेक परीक्षा मधून जाऊन लोकेशन योग्य की अयोग्य हे ठरतं. हेही वाचा - 'लहानपणीचे कपडे ते साडी उधार घेण्यापर्यंत...', दिग्दर्शकाच्या लेकीनं हर्षदासाठी लिहिली खास बर्थ डे पोस्ट
  View this post on Instagram

  A post shared by (@omkar_mangesh)

  केदार शिंदे यांनी पुढे म्हटलंय, 'गेले तीन दिवस महाराष्ट्र शाहीर ची टीम ह्याच कामात व्यस्त होती. सातारा आणि आसपासच्या भागातील अनेक सुंदर लोकेशन फिरून, निवडून, खूप भटकून, डोंगर दऱ्या चढून उतरून आम्ही जेव्हा हे तीन दिवस पूर्ण केले तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. महाराष्ट्र शाहीरच्या घडणीतला हा एक महत्त्वाचा टप्पा. अजून पुढे खूप मोठा प्रवास बाकी आहे. काही प्रवास हे मुक्कामा इतकेच सुंदर असतात!', असं केदार शिंदेंनी म्हटलं. केदार शिंदेचा महाराष्ट्र शाहीर हा आगामी सिनेमात कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सिनेमात अंकुश चौधरी शाहिर साबळेंच्या प्रमुख भूमिकेत असून अजय अतुल यांचं संगीत सिनेमाला लाभलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र शाहिरांच्या सिनेमाची आतूरतेनं वाट पाहत आहे. सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षाकंच्या भेटीला येणार आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या