मुंबई, 28 ऑगस्ट- मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागून आहे. शाहीर साबळेंचा जीवनपट पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. दरम्यान या बहुप्रतीक्षित सिनेमाची रिलीज डेट आता समोर आली आहे. केदार शिंदे यांनी एक रंजक पोस्ट शेअर करत या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. मराठीतल्या दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदेहे होय. सही रे सही, श्रीमंत दामोदरपंत, तू तू.. मी..मी..,गेला उडत, गोपाळा रे गोपाळा अशी नाटकं. हसा चकटफू, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय, साहेब बिबी आणि मी या मालिका ऑन ड्युटी चोवीस तास, बकुळा नामदेव घोटाळे, अगं बाई अरेच्चा, यंदा कर्तव्य आहे अशा सिनेमांचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. आता शिंदे आपल्या नव्या सिनेमासोबत चित्रपटगृहात परतण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या बहुचर्चित चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. केदार शिंदे पोस्ट- केदार शिंदे यांनी ओंकार मंगेश यांची एक पोस्ट रिपोस्ट केली आहे. यामध्ये लिहलंय, शाहीर साबळे म्हणजे आमचे बाबा.. त्यांनी सिनेमात सुद्धा काम केलं होतं.. १९६५ साली प्रदर्शित झालेल्या ’ वावटळ ’ ह्या सिनेमात त्यांनी दादला नको ग बाई हे गाणं गावून त्यावर परफॉर्म सुद्धा केलं होतं..त्या नंतर अनेक सिनेमांच्या ऑफर त्यांना आल्या होत्या पण त्यांनी पुन्हा कधीही सिनेमासाठी गाणं गायलं नाही आणि पडद्यावर काम सुद्धा केलं नाही.. असं का? ह्या मागचं नेमकं काय कारण होतं?शाहीरांचा रोचक जीवन प्रवास उलगडणार ’ महाराष्ट्र शाहीर ’ ह्या सिनेमाद्वारे २८ एप्रिल २०२३ रोजी तुमच्या नजीकच्या सिनेमागृहात..’
**(हे वाचा:** सुबोध भावे आणि सयाजी शिंदेंच्या जुगलबंदीची थरारक कथा; ‘कालसूत्र’चा ट्रेलर प्रदर्शित ) ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी अंकुशच्या लुक्सवर जबरदस्त कष्ट घेण्यात आले आहेत. शाहीर साबळेंच्या गेटअपमध्ये अंकुशला ओळखणंदेखील कठीण होत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.परंतु चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढच्या वर्षी २८ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

)







