मुंबई, 10 मे : मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते केदार शिंह (Kedar Shinde) हे दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नाला 25 वर्षे झाल्याच्या (25th marriage annieversary) निमित्ताने पुन्हा एकदा त्यांनी पत्नीबरोबर पारंपरिक पद्धतीनं विवाह (Traditional Marriage Ceremony) केला. त्यांच्या या विवाहाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
(वाचा-या चिमुरड्यांना ओळखलं का? तुमच्या आवडत्या मराठी अभिनेत्री बालपणी दिसायच्या अशा)
केदार शिंदे यांच्या घरातच अगदी मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. रविवारी 9 मे रोजी केदार शिंदे आणि त्यांच्या पत्नी बेला (Bela Shinde) यांना पुन्हा एकदा विवाह केला. त्यांच्या या विवाहाला केदार आणि बेला यांचे अगदी जवळचे मित्र अंकुश चौधरी(Ankush Chaudhary), भरत जाधव(Bharat Jadhav), सिद्धार्थ जाधव(Siddharth Jadhav), शर्मन जोशी (Sharman Joshi) आणि आदेश तसेच सुचित्रा बांदेकर (Adesh bandekar and Suchitra Bandekar) यांची उपस्थिती होती. त्याशिवाय केदारचे अनेक मित्र आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून केदार आणि बेला यांच्यावर अक्षता टाकल्या. वसुंधरा साबळे यांनी फेसबूकवर या दोघांच्या लग्नाचे फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली.
केदार आणि बेला शिंदे यांनी प्रेमविवाह केला आहे. विशेष म्हणजे या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होते. त्यामुळं पहिलं लग्न झालं त्यावेळी हौस मौज काय पण अगदी काहीच परंपरा, विधी या दोघांना अनुभवता आले नव्हते. त्यामुळं लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना तो सर्न अनुभव मिळवून द्यायचं असं कुटुंबीयांनी ठरवलं होतं. केदार यांची कन्या सना हिनं सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. त्यानुसार सर्वकाही ठरवण्यात आलं. त्यानुसार रविवारी अगदी पारंपरिक पद्धतीनं विधिवत पुन्हा एकदा केदार आणि बेला यांची लग्नगाठ जुळली.
(वाचा-या अभिनेत्रीमुळं मिळाली अयुष्याला कलाटणी; पाहा शिवाली परबचा हास्यप्रवास)
कोरोनाच्या संकट काळामुळं या विवाह सोहळ्याला बेला यांचे आई वडिल उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळं आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर या सेलिब्रिटी कपलने बेलाचं कन्यादान केलं. हळद, साखरपुडा किंवा इतर कोणतेही विधी 25 वर्षांपूर्वी झाले नाही. त्यामुळं की सगळी हौस त्यांच्या मुलीने लग्नाच्या 25 व्या वाढदिवशी पूर्ण केली.
View this post on Instagram
सोशल मीडियावर सध्या अनेक ठिकाणी केदार आणि बेला शिंदे यांच्या लग्न सोहळ्याचे हे फोटो व्हायरल होत आहे. या दोघांच्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाली. कोणताही मुहूर्त नाही की विधी नाही. तरीही त्यांनी वैवाहिक जीवनात यश मिळवलं. त्यामुळं लग्नासाठी सोहळा नव्हे तर लग्न महत्त्वाचं असतं हे आई बाबांनी पटवून दिल्याचं त्यांची मुलगी सना हिनं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment