मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

KBC 13: 'लग्न त्याच्याशीच करा जो तुमचं वजन नाही मन बघेल...', पैशांसह स्वाती यांनी जिंकली मनं

KBC 13: 'लग्न त्याच्याशीच करा जो तुमचं वजन नाही मन बघेल...', पैशांसह स्वाती यांनी जिंकली मनं

Swati Shrilekha

Swati Shrilekha

KBC 13: इंग्रजीच्या शिक्षिका असलेल्या स्वाती यांनी या शोमध्ये 6 लाख 40 हजार रुपयांची रक्कम जिंकलीच; पण त्याबरोबर त्यांनी आपल्या बाणेदारपणाने बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह लाखो प्रेक्षकांच मनही जिंकलं.

मुंबई, 27 ऑगस्ट: सध्या मनोरंजनसृष्टीत चर्चा आहे ती छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो केबीसी (KBC) अर्थात कौन बनेगा करोडपतीची (Kaun Banega Crorepati). सोनी टीव्ही वाहिनीवर 26 ऑगस्टपासून केबीसीचं 13 वं पर्व दणक्यात सुरू झालं आहे. केबीसी म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) असं समीकरणच आता निर्माण झालं आहे. त्यामुळं या पर्वाचे सूत्रसंचालनही बिग बी अमिताभ बच्चनच करत आहेत. भारतीय टेलिव्हिजन जगतात हा शो सुरू झाल्यापासून आतापर्यंत फक्त तिसऱ्या पर्वाचा अपवाद वगळता अमिताभ बच्चन यांनीच या शोचे सूत्रसंचालन केलं आहे. दरम्यान प्रत्येक वेळी या शोने यशाचा नवा इतिहास लिहिला आहे. आताही या शोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. केबीसीचे हे पर्व सुरू होताच त्यातील स्पर्धक, त्यांचा खेळ, त्यांनी जिंकलेली रक्कम, त्यांची गुणवैशिष्ट्ये, सेटवरचे खास क्षण यांचीही चर्चा रंगू लागली आहे. अलीकडेच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले ते या शोमधील तिसऱ्या स्पर्धक ओडिशाच्या (Odisha) स्वाती श्रीलेखा (Swati Shreelekha) यांनी. इंग्रजीच्या शिक्षिका असलेल्या स्वाती यांनी या शोमध्ये 6 लाख 40 हजार रुपयांची रक्कम जिंकलीच; पण त्याबरोबर त्यांनी आपल्या बाणेदारपणाने बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह लाखो प्रेक्षकांच मनही जिंकलं. हे वाचा-हिरो आता नेता बनणार! अभिनेता Sonu sood राजकारणात येणार? खेळादरम्यान संवाद साधताना अमिताभ बच्चन यांनी स्वाती यांना त्यांच्या व्हिडीओ क्लिपवरून वैयक्तिक आयुष्याबद्दलचा एक प्रश्न विचारला. त्यावर स्वाती यांनी दिलेलं उत्तर आणि या मंचावरून तरुण मुलींना दिलेला संदेश ऐकून बिग बी आणि प्रेक्षकही प्रभावित झाले. अमिताभ बच्चन यांनी विचारलं की, ‘तुम्ही व्हिडीओ क्लिपमध्ये सांगितलं आहे की तुम्ही अविवाहित आहात आणि तुम्ही योग्य व्यक्तीची वाट पाहत आहात’. यावर स्वाती हसल्या आणि म्हणाल्या की, ‘माझं लग्नाचं वय होतं तेव्हा माझ्या घरच्यांनी माझं लग्न व्हावं यासाठी खूप प्रयत्न केले, पण जिथे जिथे माझा फोटो पाठवण्यात येत असे तिथून एकच प्रश्न विचारला जायचा, वजन किती आहे? यामुळेच मी अजून लग्न केलं नाही.' हे वाचा-हीच का ती सैराटची आर्ची? रिंकूचे Latest फोटो पाहून विश्वास नाही बसणार स्वाती पुढे म्हणाल्या की, 'ज्याला तुमचे वजन दिसत नाही, तर मन दिसते त्याच्याशीच लग्न करा’. स्वाती यांच्या या संदेशाने अमिताभ बच्चनदेखील प्रभावित झाले आणि टाळ्या वाजवत त्यांनी स्वाती यांच्या स्वाभिमानी वृत्तीला आणि सकारात्मक दृष्टिकोनाला दाद दिली. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना अनेक शुभेच्छा दिल्या. या शोमध्ये जिंकलेल्या रकमेचा वापर स्वाती शाळेसाठी करणार आहेत. केबीसीचे 13 वे पर्वही लोकप्रिय होऊ लागले आहे. या शोमधील पहिले स्पर्धक होते बीएसएमधील  ज्ञानराज. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सल्ला देण्यासाठी निवडलेल्या 100 तरुण वैज्ञानिकांमध्ये (Young Scientist) त्यांचा समावेश आहे. तर दुसरे स्पर्धक होत्या उत्तराखंडमधील पशुवैद्यकतज्ज्ञ नेहा बाथला. ज्यांनी या शोमध्ये 12 लाख 50 हजार रुपये जिंकले. यावेळी डिजिटल प्लॅटफॉर्मवर घरबसल्या यातील क्विझ शो खेळण्याची संधी प्रेक्षकांना देण्यात आली आहे. यासाठी SonyLIV App डाउनलोड करणं आवश्यक असून, त्यावर क्विझ खेळून घरबसल्या प्रेक्षकांना लाखो रुपये जिंकता येणार आहेत.
First published:

Tags: Amitabh Bachchan, KBC

पुढील बातम्या