Home /News /entertainment /

हिरो आता नेता बनणार! अभिनेता Sonu sood राजकारणात येणार?

हिरो आता नेता बनणार! अभिनेता Sonu sood राजकारणात येणार?

अभिनेता सोनू सूद आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची उद्या भेट होणार आहे.

    मुंबई, 26 ऑगस्ट : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) कोरोना महासाथीत अनेकांसाठी रिअल हिरो ठरला. आता हाच हिरो नेता बनवण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मिळते आहे. सोनू सूद आम आदमी पार्टीत येणार आहे, अशी चर्चा सध्या रंगते आहे. त्याची उद्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांची भेटही होणार आहे. आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या (शुक्रवारी) अभिनेता सोनू सूदची भेट घेणार आहेत. या भेटीकडे राजकीय दृष्टीतूनही पाहिलं जातं आहे. सोशल मीडियावर याबाबत चर्चाही होते आहे. हे वाचा - खासदार Nusrat Jahan यांनी दिली Good News!अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन अभिनेता सोनू सूद आम आदमी पार्टीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. पक्षात प्रवेश केल्यानंतर त्याला थेट पंजाब निवडणुकीतही उतरवलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून उभं केलं जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.  सोनू सूद स्वतः पंजाबच्या मोंगातील आहे. त्यामुळे त्याच्या उमेदवारीवरून काहीच वाद होण्याची शक्यता नाही, तसंच त्याने देशातील नागरिकांची सेवाही केली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Arvind kejriwal, Entertainment, Politics, Sonu Sood

    पुढील बातम्या