KBC 11 : आई आजारी होती आणि मी देशासाठी खेळत होते, बिग बींसमोर रडली हिमा दास; पाहा VIDEO

KBC 11 : आई आजारी होती आणि मी देशासाठी खेळत होते, बिग बींसमोर रडली हिमा दास; पाहा VIDEO

भारताचं नाव मोठं करायचं होतं यासाठी खेळत होते. त्याचवेळी आई आजाराशी लढत होती हे सांगताना हिमाला अश्रू अनावर झाले.

  • Share this:

मुंबई, 02 नोव्हेंबर : भारताची युवा धावपटू हिमा दास शुक्रवारी द्युती चंद आणि विरेंद्र सेहवाग यांच्यासोबत कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झाली होती. केबीसीच्या कर्मवीर शोमध्ये अमिताब बच्चन आणि विरेंद्र सेहवाग यांच्या समोर हिमा दासला रडू कोसळले. या शोमध्ये हिमा, द्युती आणि सेहवागने साडे बारा लाख रुपये जिंकले.

हिमा दासने आयएएएफ वर्ल्ड अंडर 20 चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. अशी कामगिरी करणारी हिमा पहिली भारतीय धावपटू ठरली होती. तिचं लहानपण अतिशय गरीबीत गेलं. धावण्यासाठी बूटही नव्हते. तिनं खेळात आपलं नावच कमावलं असं नाही तर अदीदास सारख्या मोठ्या कंपनीची ब्रँड अॅम्बॅसिडरही झाली.

शाहरुख खानच्या आधी सलमानच करत होता 'मन्नत' विकत घेण्याचा विचार, पण...

पाठीच्या दुखापतीने तिला काही काळ रेसिंग ट्रॅकपासून दूर रहावं लागलं होतं. केबीसीमध्ये बोलताना सांगितलं की, या दुखापतीमधून लवकरच सावरेन. पुढच्या वर्षी टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यसााठी तयारी करणार आहे. युरोपमध्ये तयारी करत असताना तिने अनेक सुवर्णपदकं जिंकली होती.

केबीसीमध्ये कुटुंबाबद्दल सांगताना हिमा म्हणाली की, आई आजारी होती पण त्यावेळी आईजवळ ती नव्हती. देशासाठी तिला बाहेर जावं लागलं होतं. भारताचं नाव मोठं करायचं होतं यासाठी खेळत होते. त्याचवेळी आई आजाराशी लढत होती हे सांगताना हिमाला अश्रू अनावर झाले. यावेळी सेहवाग आणि बिग बीसुद्धा भावुक झाले होते.

KBC मध्ये राहुल गांधींवर प्रश्न, स्पर्धकाच्या उत्तरावर BJP खासदाराने घेतली फिरकी

जगात भारताचा तिरंगा फडकवायचा आहे. ज्यावेळी भारताचं नाव कानावर पडतं तेव्हा अभिमान वाटतो असंही हिमा म्हणाली. अमिताभ बच्चन यांना हिमाने विचारलं की, इतक्या वयात एवढं काम कसं करता. यावेळी बिग बी म्हणाले की, काम करत राहिल्यानं प्रेरणा मिळते. यावेळी बिग बींनी तिला सांगितलं की, पीटी ऊषा ज्यावेळी लॉस एंजिलिस इथं ऑलिम्पिक खेळत होती तेव्हा मीही तेथे होतो. त्यावेळी स्टेडियममध्ये फक्त दोनच भारतीय होते.

सुंदर दिसण्यासाठी माझ्यावर प्रेशर होतं, जुन्या फोटोसह अभिनेत्रीचा स्पेशल मेसेज

==========================================================

VIDEO : 'नेत्यांना सुबुद्धी देवो' भाजप-सेनेच्या वादावर अमृता फडणवीस म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 04:13 PM IST

ताज्या बातम्या