शाहरुख खानच्या आधी सलमानच करत होता 'मन्नत' विकत घेण्याचा विचार, पण...

शाहरुख खानच्या आधी सलमानच करत होता 'मन्नत' विकत घेण्याचा विचार, पण...

शाहरुख महागडे कपडे, गाड्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणं असं भन्नाट आयुष्य तो जगतो.

  • Share this:

मुंबई, 2 नोव्हेंबर : बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आज 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. तो आपल्या अभिनयासाठी जेवढा ओळखला जातो तेवढाच त्याच्या लक्झरी लाइफस्टाइलसाठीही ओळखला जातो. महागडे कपडे, गाड्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणं असं भन्नाट आयुष्य तो जगतो. चाहत्यांना शाहरुखबद्दल जेवढं जाणून घेण्याची उत्सुकता असते तेवढीच उत्सुकता त्याच्या घराची मन्नतबद्दलचीही असते. शाहरुखचं हे घर जवळपास २०० कोटी रुपयांचं आहे. असं असलं तरी फार कमी लोकांना हे माहीत आहे की शाहरुखच्या आधी हे घर सलमान खान विकत घेणार होता. पण सलमानने हा बंगला का विकत घेतला नाही?

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सलमानने हे घर विकत न घेण्याचं कारण सांगितलं. सलमान म्हणाला की, जर माझ्या बाबांनी सलीम खान यांनी मला एवढ्या मोठ्या घरात तू करणार काय? हा प्रश्न विचारला नसता तर मी हे घर नक्कीच घेतलं असतं. सलमानने आपल्या वडिलांचं ऐकलं आणि त्याने तो बंगला न घेण्याचा निर्णय घेतला. ५३ वर्षीय सलमान म्हणाला की, ‘मलाही शाहरुखला हाच प्रश्न विचारायचा आहे की, एवढ्या मोठ्या घरात तो करतो तरी काय?’

Birthday Special : शाहरुख खानचे UNSEEN PHOTO पाहा एका क्लिकवर

शाहरुखने एका रेडिओ शोमध्ये मन्नतबद्दल बोलताना म्हटलं की, ‘मी दिल्लीचा आहे आणि दिल्लीच्या लोकांना मोठ्या घरात राहण्याची सवय असते. तर मुंबईत अपार्टमेन्टमध्ये राहण्याची कन्सेप्ट आहे.’ शाहरुख पुढे म्हणाला की, ‘दिल्लीत कोणी श्रीमंत जरी नसला तरी तो छोटासा बंगला घेण्याचा प्रयत्न करतो.’ ‘जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा मी छोट्या अपार्टमेन्टमध्ये पत्नी गौरीसोबत राहत होतो. माझी सासू नेहमी मला म्हणायची की तुम्ही एवढ्या लहान घरात कसं काय राहता. जेव्हा मी मन्नत पाहिला तेव्हा माझ्या मनात पहिली गोष्ट कोणती आली असेल तर ती ही होती की दिल्लीसारखं घर.’

सलमानचा ‘राधे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, 'या' अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

 

View this post on Instagram

 

A ray of sunshine... A sea of love... Thank you all for the happiness you bring every year!

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on

किंग खान म्हणाला की, त्याने मन्नत पाहिल्यावरच तो विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. तसंच आतापर्यंतच शाहरुखचं सर्वात महागड्या पॅशनपैकी मन्नत विकत घेणं हेच आहे.

ऐश्वर्यावरील ‘त्या’ कमेंटनंतर किंग खानच्या कानाखाली मारणार होत्या जया बच्चन!

=====================================================================

VIDEO : 'नेत्यांना सुबुद्धी देवो' भाजप-सेनेच्या वादावर अमृता फडणवीस म्हणाल्या...

First published: November 2, 2019, 3:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading