जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सुंदर दिसण्यासाठी माझ्यावर प्रेशर होतं', जुन्या फोटोसह अभिनेत्रीनं दिला स्पेशल मेसेज

'सुंदर दिसण्यासाठी माझ्यावर प्रेशर होतं', जुन्या फोटोसह अभिनेत्रीनं दिला स्पेशल मेसेज

'सुंदर दिसण्यासाठी माझ्यावर प्रेशर होतं', जुन्या फोटोसह अभिनेत्रीनं दिला स्पेशल मेसेज

या अभिनेत्रीनं स्वतःचा एक जुना फोटो शेअर करत वुमेन लुकच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 2 नोव्हेंबर : बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र त्यांनी त्यावर हार न मानता मात केली आणि स्वतःला आपल्या कामाच्या आणि परफॉर्मन्सच्या माध्यमातून सिद्धही केलं. पण आता या अभिनेत्री बॉडी शेमिंगवर उघडपणे बोलू लागल्या आहेत. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे समीरा रेड्डी. समीरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि ती अनेकदा वुमेन एंपावरमेंटबद्दल बोलताना दिसते. त्यानंतर आता समीरानं स्वतःचा एक फोटो शेअर करत तिने वुमेन लुकच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. समीरानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिनं खूपच सैलसर कपडे घातले आहेत. समीरा व्हाइट चेक शर्टमध्ये दिसत आहे आणि हा तिचा टीनएजर फोटो आहे. या पोस्टमध्ये समीरानं मीम मेकर्सना टॅग केलं आहे. तिनं तिच्या पोस्टमध्ये सांगितलं, लोक मला माझ्या शरीरावरुन बोलत असत आणि माझ्यावर चांगलं दिसण्याचं प्रेशर होतं. सलमानचा ‘राधे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

    जाहिरात

    समीरानं फोटो शेअर करताना लिहिलं, ‘प्रेम करणारा पती आणि दोन मुलांव्यतिरिक्त आजही अनेकवेळा मला तीच चिंता सतावते आणि मला माझ्या शरीरावर शंका येऊ लागते.’ समीरानं तिच्या या पोस्टवर अनेक महिलांनी त्यांच्या समस्या सांगितल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, हे प्रेशर आपल्याला खूप त्रास देतं. याबद्दल बोललात त्यासाठी धन्यवाद. याशिवाय अनेक महिलांनी समीरा रेड्डी त्यांना प्रेरणा देत असल्याचं म्हटलं आहे. ऐश्वर्यावरील ‘त्या’ कमेंटनंतर किंग खानच्या कानाखाली मारणार होत्या जया बच्चन! कंगना ‘या’ राजकीय नेत्याच्या बायोपिकसाठी करतेय परिक्षेसारखी तयारी ==================================================================== VIDEO : ‘नेत्यांना सुबुद्धी देवो’ भाजप-सेनेच्या वादावर अमृता फडणवीस म्हणाल्या…

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात