नवी दिल्ली 21 जुलै : भारताची अव्वल धावपटू हिमा दासचा सुवर्णपदकांचा धडाका सुरूच आहे. अवघ्या 20 दिवसात हिमानं जबरदस्त कामगिरीच्या जोरावर पाच पदकं पटकावली. तसंच हिमानं मोसमातल्या सर्वोत्तम कामगिरीचीही नोंद केली. हिमा दासच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून देशाला सुवर्णपदक मिळणार हे आता निश्चित होऊ लागलंय. तिने आसामच्या पुरात विस्थापित झालेल्यांना मदत करण्याची घोषणाही केलीय.