KBC मध्ये राहुल गांधींवर प्रश्न, स्पर्धकाच्या उत्तरावर BJP खासदाराने घेतली फिरकी

KBC मध्ये राहुल गांधींवर प्रश्न, स्पर्धकाच्या उत्तरावर BJP खासदाराने घेतली फिरकी

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात राहुल गांधीबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर चुकीचे दिल्यानंतर भाजप खासदाराने स्पर्धकाची फिरकी घेतली.

  • Share this:

मुंबई, 02 नोव्हेंबर : कौन बनेगा करोडपती या शोमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सहभागी स्पर्धकाने चुकीचं उत्तर दिलं. त्यावरून भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांनी स्पर्धकाचे उत्तर चुकल्याबद्दल माफी मागितली आहे. केबीसीच्या एका शोमध्ये स्पर्धकाला प्रश्न विचारण्यात आला होता की, 17 व्या लोकसभेत कोणता खासदार जपानच्या मार्शल आर्ट आइकिडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवलेला आहे. यावर चार पर्याय देण्यात आले होते. त्यात गौतम गंभीर, राहुल गांधी, अनुराग ठाकुर आणि तेजस्वी सुर्या यांच्या नावाचा समावेश होता.

प्रश्नाचे उत्तर देताना स्पर्धकाने तेजस्वी सुर्या हा पर्याय योग्य असल्याचं सांगितलं. मात्र, प्रश्नाचे योग्य उत्तर राहुल गांधी असं होतं. चुकीच्या उत्तरामुळे स्पर्धकाला बाहेर पडावं लागलं. यावर बेंगळुरूचे खासदार असलेल्या तेजस्वी यांनी आपल्याला वाईट वाटलं असं म्हटलं आहे.

भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांनी म्हटलं की, भावा तुझ्यासाठी मला वाईट वाटत आहे. माझ्याकडे आइकिडो ब्लॅक बेल्ट असता तर तु आज श्रीमंत झाला असतास.

तेजस्वी सुर्या यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर युजर्सनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमावेळी आपण जपानी मार्शल आर्ट आइकिडोमध्ये ब्लॅकबेल्ट असल्याचं सांगितलं होतं. काँग्रेसने याचा व्हिडिओसुद्दा सोशल मिडियावर शेअऱ केला होता.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 कोंटींची तरतूद, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पाहा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: November 2, 2019, 3:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading