मुंबई, 16 ऑक्टोबर : अमिताभ बच्चन यांचा क्विज शो कौन बनेगा करोपतीचा 11 वा सीझन सध्या खूपच चर्चेत आहे. प्रत्येक दिवशी या शोमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या शोमध्ये फक्त 2 स्पर्धक करोडपती होण्यात यशस्वी ठरले आहेत. पण आता या सीझन मधला तिसरा करोडपती आता केबीसी मिळणार आहे. आज म्हणजे 16 ऑक्टोबरला प्रसारित होणाऱ्या या शोच्या एपिसोड मध्ये बिहारचे गौतम झा या सीझनचे तिसरे करोडपती होणार आहेत. त्यांनी 1 कोटी जिंकण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंगळवारी झालेल्या एपिसोडमध्ये गौतम झा यांनी खेळ सुरू केला होता. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंड क्रॉस केल्यानंतर त्यांना अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली आणि या संधीचं त्यांनी सोनं केलं. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंडमध्ये त्यांना विचारण्याच आलेला प्रश्न- या मुख्यमंत्र्यांची नावं राज्यानुसार उत्तर ते दक्षिण या क्रमानं लावा आणि याचं उत्तर होतं, कॅप्टन अमरिंदर सिंह, विजय रूपाणी, व्हाय. एस. जगन मोहन रेड्डी, पिनारयी विजयन. OMG! भावाला मुलींसोबत डान्स करताना पाहून नेहा कक्करनं काढली चप्पल
मंगळवारच्या एपिसोडमध्ये दाखवल्याप्रमाणे गौतम झा 40 हजार जिंकण्यात यशस्वी ठरले होते. त्यानंतर खेळ आजच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात येणार आहे. सोनी टीव्हीनं त्याच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओनुसार आज गौतम झा यांनी 1 कोटी जिंकल्याची घोषणा बिग बी करतील. तर यापुढे ते 7 कोटींच्या प्रश्नासाठी खेळताना दिसणार आहे. 7 कोटींच्या प्रश्नांचं उत्तर देऊन ते ही रक्कम जिंकणार का याविषयी आता प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
Bigg Bossच्या घरातून बाहेर पडल्यावर कोएना मित्रानं सलमानवर केले गंभीर आरोप
गौतम झा यांना विचारण्यात आलेले प्रश्न प्रश्न : परदेशात जाताना तुम्ही तुमच्यासोबत कोणता दस्तावेज सोबत ठेवण्याची आवश्यकता आहे? उत्तर : पासपोर्ट प्रश्न : भारताची सांस्कृतीक विविधता दाखवणारं वाक्य ‘कोस-कोस पर पानी बदले चार कोस पर वाणी’ मधील कोस म्हणजे काय? उत्तर : दोन प्रदेशातील अंतर मोजण्याचं परिमाण प्रश्न : स्वरा भासकरची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाच्या नावातील कोणता शब्द गायब आहे- ‘अनारकली ऑफ…’? उत्तर : आरा
कबीर सिंह’च्या चाहत्यानं एकतर्फी प्रेमातून केला मुलीचा खून, नंतर केली आत्महत्या
प्रश्न : यातील कोणता सण सूर्य षष्ठी म्हणून ओळखला जातो? उत्तर : छठपूजा प्रश्न : हे गाणं ऐकून सिनेमाचं नाव सांगा? उत्तर : बादशाह प्रश्न : सिंडिकेट बँकच्या लोगोमध्ये कोणत्या प्राण्याचं चित्र आहे? उत्तर : कुत्रा प्रश्न : जयशंकर प्रसाद, सूर्यकांत त्रिपाठी निराला, सुमित्रानंदन पंत आणि महादेवी वर्मा हे हिंदी साहित्याच्या कोणत्या युगाचे चार मुख्य स्तंभ मानले जातात उत्तर : छायावाद केबीसी 11 मध्ये गौतम झा त्याची पत्नीसोबत आले होते. गौतम यांचं शिक्षण आयआयटी इंजिनिअरिंग पर्यंत झालं असून ते भारतीय रेल्वेमध्ये सिनिअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
जान्हवी-इशानने साजरा केला ‘करवाचौथ’, सोशल मीडियावर VIDEO VIRAL
================================================= कोकणचं निसर्गसौंदर्य आणि गुराख्याच्या बसरीचे सूर, पाहा SPECIAL REPORT