'कबीर सिंह'च्या चाहत्यानं एकतर्फी प्रेमातून केला मुलीचा खून, नंतर केली आत्महत्या

'कबीर सिंह'च्या चाहत्यानं एकतर्फी प्रेमातून केला मुलीचा खून, नंतर केली आत्महत्या

अश्वनि कुमार हा टिक टॉक स्टार कबीर सिंह या व्यक्तिरेखेनं प्रेरित झालेला होता. आपल्या व्हिडीओमध्ये नेहमीच तो कबीरचे संवाद आणि त्याची मिमिक्रि करताना दिसत असे.

  • Share this:

मुंबई, 16 ऑक्टोबर : बॉलिवूडमध्ये प्रत्येक वर्षी नवे सिनेमा येतात. पण काही सिनेमा असे असतात जे काही ना काही कारणानं वादाच्या भोवऱ्यात सापडतात. यंदाच्या वर्षातील असा एक सिनेमा म्हणजे कबीर सिंह. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनेकांनी त्याला विरोध केला. नशा करणे, महिलांचा अनादर करणे, रागीट स्वभाव हे सर्व मिळून ही व्यक्तिरेखा साकारण्यात आली होती. काहींनी याचा विरोध केला तर काही मात्र या सिनेमाचे चाहते बनले. पण नुकताच या सिनेमाच्या एका चाहत्यानं मात्र कहरच केला. टिक टॉक व्हिडीओमध्ये कबीर म्हणून प्रसिद्ध असलेली ही व्यक्ती प्रत्यक्षात मात्र खुनी निघाली.

टिक टॉकवर करायचा कबीर सिंहची मिमिक्री

उत्तर प्रदेशच्या बिजनौरचा रहिवासी असलेला अश्वनि कुमार प्रसिद्ध टिक टॉक स्टार होता. त्याला टिक टॉकवर टिक टॉक व्हिलन आणि जॉनी दादा या नावांनी ओळखलं जात असे. अश्वनि हा कबीर सिंह या व्यक्तिरेखेनं प्रेरित झालेला होता. आपल्या व्हिडीओमध्ये नेहमीच तो कबीरचे संवाद आणि त्याची मिमिक्रि करताना दिसत असे. आता या तरुणावर फ्लाइट अटेंडेंट निकिता शर्मा नावाच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. अश्वनि कुमारला ही मुलगी आवडत होती. मात्र हे एकतर्फी प्रेमप्रकरण होतं. या मुलीचं डिसेंबरमध्ये लग्न होणार होतं.

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री यंदा साजरा करणार पहिला 'करवाचौथ'

'जो मेरा नहीं हो सकता उसे किसी और के होने का मौका नहीं दूंगा...' असा संवाद बोलत अश्वनि कुमारनं एक व्हिडीओ शेअर केला होता आणि त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झाला होता.

लग्नाच्या वृत्तानं संतापला खुनी

निकिता शर्माचं लग्न होणार आहे हे समजल्यावर अश्वनि कुमार संतापला होता आणि संतापाच्या भरात या मुलीची हत्या करुन तो फरार झाला. पण पोलिसांनी त्याला शोधून काढलं. त्यानं आत्मसमर्पण करावं असं पोलिसांनी सांगितलं. पण असं करण्याऐवजी त्यानं स्वतःला गोळी घालून घेत आत्महत्या केली. 30 सप्टेंबरला अश्वनिनं भरदिवसा गोळी घालून निकिताची हत्या केली.

याआधीही अश्वनिनं केले होते 2 खून

अश्वनिनं 10 वर्षांपूर्वी निकिताकडे प्रेमाचा प्रस्ताव मांडला होता. मात्र निकितानं त्याला नकार दिला व त्यानंतर ती दुबईमध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती. लवकरच ती लग्न सुद्धा करणार होती. निकिता अगोदर अश्वनिनं एका स्वतःच्या चुलत भावांना गोळी मारुन26 सप्टेंबरला त्यांची हत्या केली होती.

अभिनेत्री नुसरत भारुचानं पुन्हा एकदा शेअर केले बिकिनी फोटो, चाहते म्हणाले...

कबीर सिंहच्या दिग्दर्शकांची प्रतिक्रिया

या प्रकरणी कबीर सिंहच्या दिग्दर्शकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मिड डेला दिलेल्या मुलाखतीत संदीप वांगा म्हणाले, 'मला त्या मुलीसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी  खूप वाईट वाटतं. मला मान्य आहे की सिनेमा तयार करत असताना अशा संवेदनशील गोष्टींवर लक्ष द्यायला हवं. पण माझ्या सिनेमात अशाप्रकारचं काहीही दाखवण्यात आलं नव्हतं.'

Beauty Pageant च्या सौंदर्यवतीला विचारला PM मोदींबाबत प्रश्न, उत्तर झालं व्हायरल

=============================================================

कोकणचं निसर्गसौंदर्य आणि गुराख्याच्या बसरीचे सूर, पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 12:45 PM IST

ताज्या बातम्या