Bigg Bossच्या घरातून बाहेर पडल्यावर कोएना मित्रानं सलमानवर केले गंभीर आरोप

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पहिल्याच प्रतिक्रियेमध्ये कोएनानं सलमानवर धक्कादायक आरोप केले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 02:28 PM IST

Bigg Bossच्या घरातून बाहेर पडल्यावर कोएना मित्रानं सलमानवर केले गंभीर आरोप

मुंबई, 16 ऑक्टोबर : टीव्हीवरील वादग्रस्त शो बिग बॉस 13मध्ये आता फिनाले रेस सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या ‘विकेंड का वार’मध्ये सलमाननं याची घोषणा सुद्धा केली. त्यानंतर घरातलं पहिलं नॉमिनेशन झालं असून यातून दोन स्पर्धक घराबाहेर पडले आहेत. यातील एक स्पर्धक म्हणजे अभिनेत्री कोएना मित्रा. तिला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. पहिल्याच टास्कमध्ये तिचा परफॉर्मन्स पाहता तिला अशाप्रकारे घरातून बाहेर काढणं कोणालाही पटलेलं नाही. त्यानंतर बिग बॉसच्या फॉरमॅटवर अनेक प्रश्न उठले. त्यानंतर आता कोएनानं यावर मौन सोडलं असून तिनं चक्क सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पहिल्याच प्रतिक्रियेमध्ये  कोएनानं सलमानवर धक्कादायक आरोप केले आहेत. इंडिया टाइम्सशी बोलताना कोएना म्हणाली, सलमाननं मला माझी बाजू मांडण्याची संधीही दिली नाही. एका आठवड्यानंतर त्याचं वागणं मला पूर्णपणे एका बाजूला झुकलेलं वाटू लागलं. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात मी शहनाझ सर्वांची खिल्ली उडवते यावर बोलायला सुरुवात केली तर त्यावर सलमाननं तिचा बचाव करत लोकांना हे आवडत आहे असं सांगितलं. मला वाटतं सलमान वैयक्तिक पातळीवर सलमान तिची पाठराखण करत आहे.

जान्हवी-इशानने साजरा केला 'करवाचौथ', सोशल मीडियावर VIDEO VIRAL

कोएना पुढे म्हणाली, जेव्हा मी घरातून बाहेर पडले त्यानंतर मी वास्तव पाहिलं. त्यावरुन मला समजलं की शहनाझ कोणालाच आवडत नाही. सर्वजण फक्त तिची खिल्ली उडवत आहेत. जेव्हा मी सलमानला विचारलं, लोकांना तुमचं वागणं, प्रामाणिकपणा आणि त्तत्वं आवडत नाही का? यावर तो म्हणाला, यासाठी वेगळा प्लॅटफॉर्म आहे. याचा अर्थ असा की हा शो तत्त्वांच्या आधारावर चालत नाही.

Loading...

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री यंदा साजरा करणार पहिला 'करवाचौथ'

कोएनाच्या मते, सलमाननं भारतीय प्रेक्षकांना एक विचार दिला की या शोमध्ये सन्मानकारक, शिक्षित आणि बुद्धिमान महिलांना जागा नाही. हा मंच सर्वांसाठी नाही. तर मग हा प्लॅटफॉर्म भारतात का आहे. अशी कोणती गोष्ट तुम्हाला प्रमोट करायची आहे. जेव्हा मी विकेंड का वार दरम्यान त्याठिकाणी होते तेव्हा मला वाटलं की सलमान माझ्या विरोधात आहे. त्याच्या अशा वागण्यानं मी खूपच निराश झाले आहे.

अभिनेत्री नुसरत भारुचानं पुन्हा एकदा शेअर केले बिकिनी फोटो, चाहते म्हणाले...

================================================================

कोकणचं निसर्गसौंदर्य आणि गुराख्याच्या बसरीचे सूर, पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 02:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...