जान्हवी-इशानने साजरा केला 'करवाचौथ', सोशल मीडियावर VIDEO VIRAL

जान्हवी-इशानने साजरा केला 'करवाचौथ', सोशल मीडियावर VIDEO VIRAL

'धडक' सिनेमातून डेब्यू करणारे जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या करवाचौथचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 16 ऑक्टोबर :  सध्या सर्वत्र करवाचौथची धूम आहे. यात बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा मागे नाहीत. पण अशात मागच्या वर्षी 'धडक' सिनेमातून डेब्यू करणारे जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या करवाचौथचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघंही करवाचौथ साजरा करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर या व्हिडीओमध्ये बॅकग्राउंडला 'दिल वाले दुल्हनियाँ ले जाएंगे'मधील करवाचौथ गीत सुद्धा ऐकू येत आहे.

जान्हवी आणि इशान यांचा हा व्हिडीओ टीव्ही शो 'मुव्ही मस्ती विथ मनीष पॉल'च्या सेटवरील आहे. जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांनी नुकतीच मनिष पॉलच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी या दोघांनी या ठिकाणी खूप मस्ती सुद्धा केली. त्यांनी यावेळी या सेटवर असा अभिनय केला की ते दोघंही रिअल लाइफमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आहेत.

अभिनेत्री नुसरत भारुचानं पुन्हा एकदा शेअर केले बिकिनी फोटो, चाहते म्हणाले...

 

View this post on Instagram

 

Watch me travel back to time with @ishaankhatter only on Movie Masti with Maniesh Paul, tonight 9:30 PM only on #ZeeTV. #ThrowbackTo90s #LOLWithManieshPaul #MovieMasti @manieshpaul @ishaankhatter @zeetv

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

या सेटवर या दोघांनीही बॉलिवूडची बेस्ट ऑनस्क्रिन रोमँटिक जोडी राज कपूर आणि नर्गिस ट्रिब्यूट दिला. याशिवाय 'श्री 420'चं लोकप्रिय गाणं 'प्यार हुआ इकरार हुआ' या गाण्यावरही डान्स केला. जान्हवीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या शोच्या आगामी एपिसोडचा प्रोमो शेअर केला.

Beauty Pageant च्या सौंदर्यवतीला विचारला PM मोदींबाबत प्रश्न, उत्तर झालं व्हायरल

जान्हवीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच कारगील गर्ल गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. याशिवाय राजकुमार रावसोबत 'रुही अफजा'मध्ये ती स्क्रिन शेअर करणार आहे.

हॉट अँड सेक्सी मलायकाचा नवा जिम VIDEO पाहिला का? तुमची हटणारच नाही नजर

=====================================================

कोकणचं निसर्गसौंदर्य आणि गुराख्याच्या बसरीचे सूर, पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 10:33 AM IST

ताज्या बातम्या