OMG! भावाला मुलींसोबत डान्स करताना पाहून नेहा कक्करनं काढली चप्पल

OMG! भावाला मुलींसोबत डान्स करताना पाहून नेहा कक्करनं काढली चप्पल

नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 16 ऑक्टोबर : बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्करच्या सुरेल आवाजाचे असंख्य चाहते आहे. पण सध्या ती अनेक म्युझिक डायरेक्टर्सची पहिली पसंती ठरत आहे. आजकाल प्रत्येक सिनेमात एक तरी नेहा कक्करचं गाणं ऐकायला मिळतं. नेहा जेवढी तिच्या गाण्यासाठी ओळखली जाते. तेवढीच ती तिच्या गमतीशीर डान्स व्हिडीओसाठीही प्रसिद्ध आहे. पण नुकत्याच व्हायरल झालेल्या तिच्या एका व्हिडीओमध्ये ती भाऊ टोनी कक्करला चपलेनं मारताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नेहाचा भाऊ टोनी कक्कर एका मुलीसोबत डान्स करताना दिसत आहे. पण अचानक नेहा हातात चप्पल घेऊन येते आणि मग टोनीनं कान पकडून तिची माफी मागितली आणि तिथून बाजूला झाला. नेहा कक्करचा हा व्हिडीओ खूपच मजेशीर आहे. टोनीचं नवं गाणं 'नागिन जैसे' नुकतच रिलीज झालं आहे. टोनीचं हे गाणं एक मजेदार डान्सिंग नंबर आहे. ज्यात काही डान्सर्ससोबत नेहा सुद्धा डान्स करत होती.

कबीर सिंह'च्या चाहत्यानं एकतर्फी प्रेमातून केला मुलीचा खून, नंतर केली आत्महत्या

या व्हिडीओची खास गोष्ट अशी की, हे गाणं डान्स क्लासमध्ये शूट करण्यात आलं आहे. ज्यात वेगवेगळ्या वयाच्या व्यक्ती एकत्र डान्स करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर अंकल-आंटीच्या वयाचे लोकही डान्स करताना दिसत आहेत. पण जेव्हा या गाण्याच्या धूनवर जेव्हा टोनी एका मुलीसोबत डान्स करताना दिसतो त्यावेळी मात्र नेहा चप्पल हातात घेऊन टोनीकडे येते.

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री यंदा साजरा करणार पहिला 'करवाचौथ'

नेहा कक्करचा भाऊ टोनी हा सुद्धा गायक आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचं कांताबाई हे गाणं रिलीज झालं होतं. जे खूपच लोकप्रिय ठरलं. बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर मूळची दिल्लीची राहणारी आहे. 30 वर्षीय नेहा रिअलिटी शे 2006 मध्ये इंडियन आयडलची स्पर्धक होती. सध्या ती त्याच शोमध्ये अनु कपूर आणि विशाल ददलानी यांच्यासोबत परिक्षक म्हणून काम पाहत आहे.

जान्हवी-इशानने साजरा केला 'करवाचौथ', सोशल मीडियावर VIDEO VIRAL

================================================

कोकणचं निसर्गसौंदर्य आणि गुराख्याच्या बसरीचे सूर, पाहा SPECIAL REPORT

Published by: Megha Jethe
First published: October 16, 2019, 4:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading